शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान! आयुष्मान भारतच्या 'या' लिंकवर क्लिक करू नका...

By हेमंत बावकर | Updated: October 22, 2018 12:32 IST

आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

मुंबई : देशातील गरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2011 च्या सामाजिक जनगणनेनुसार 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचा आरोग्य विमा कवच पुरविले आहे. मात्र, या आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ही बनावट लिंक असून तुमची माहिती मिळविण्यासाठी याचा वापर केला जात आहे. 

काय आहे हा मॅसेज? 13 ते 70 वर्षांच्या 10 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचा नि:शुल्क विमा देण्यात येत आहे. या साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर आहे. यामुळे लवकरात लवकर या लिंकवरील वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा. तसेच ही लिंक मित्रांसोबतही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील. 

या मेसेजनंतर https://Govt-Yojna.org.in/Ayushmaan-Bharat/?Apply-Here ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि भारत सरकारचा लोगो असलेला मोठा बॅनर दिसतो. यानंतर संबंधित व्यक्तीकडे त्याच्या विषयीची माहिती मागितली जाते. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, वय, राज्य या बाबींचा समावेश आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नही विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्तरानंतर अर्ज यशस्वीपणे मिळाल्याचे सांगितले जाते. यानंतर डिजिटल India च्या प्रचारासाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी WhatsApp 10 ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करावी लागेल असे सांगितले जाते. यानंतर निळ्या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर मिळणार असल्याने भासवले जाते.  https://govt-yojna.org.in/Ayushmaan-Bharat/step2.html ही ती लिंक आहे, जी माहिती न भरताच उघडते.

'लोकमत'ने केलेल्या तपासानुसार ही लिंक बनावट आहे. या द्वारे तुमची माहिती चोरली जाते. या माहितीमध्ये तुमचा मोबाईल क्रमांकही दिला जात असल्याने याचा वापर अन्य कारणांसाठी होणार आहे. या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा मेसेज करून फसवणुकीचे प्रकारही होण्याची शक्यता आहे. यामुळे या लिंकवर माहिती भरण्यापासून सावध राहिल्यास चांगले. 

सत्य काय?केंद्र सरकारची खरी लिंक https://www.abnhpm.gov.in/ ही आहे. या वेबसाईटवरील फोटो वापरण्यात आला आहे. खरे म्हणजे, आयुष्मान योजनेसाठी केंद्र सरकारने 2011 च्या सामाजिक जनगणनेनुसार 10 कोटी कुटुंबांना आधीच निवडलेले आहे. यामध्ये समावेश नसलेल्या कुटुंबांसाठी रजिस्ट्रेशन करता येणार नाही. यामुळे अशी कोणतीही लिंक  देण्यात येणार नाही. यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या व्यक्तींमधील नाराजीचा फायदा काही समाजकंटक घेण्याची शक्यता आहे. ही बनावट लिंक याचाच एक भाग आहे.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतFake Newsफेक न्यूजNarendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइल