अयोध्याप्रश्नी नाशिकमध्ये लवकरच बैठक होणार
By Admin | Updated: June 4, 2015 04:09 IST2015-06-04T04:09:12+5:302015-06-04T04:09:12+5:30
अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये याचिकाकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या

अयोध्याप्रश्नी नाशिकमध्ये लवकरच बैठक होणार
नाशिक : अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये याचिकाकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीतच हा वाद मिटावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा निर्वाणी आखाड्याचे महंत ग्यानदास महाराज यांंनी दिली.
अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उच्च न्यायालयात या विषयाचा निवाडा करण्यात आला. तथापि, उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करून जागा वाटपाची शिफारस केली. तथापि, त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यासंदर्भात वाद सोडविण्यासाठी महंत ग्यानदास यांनी अयोध्येत एक बैठक घेतली होती. तथापि, आता पुन्हा हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबरी मशिदीसाठी दावा करणारे मोहंमद हासीम अन्सारी आपले मित्र असून, त्यांना बोलाविल्यावर ते नाशिकमध्ये येतील, असे महंत ग्यानदास यांनी सांगितले. यापूर्वी आपण एक बैठक घेतली होती. त्यावेळी १६ याचिकाकर्त्यांपैकी दहा ते अकरा जण उपस्थित होते. आता मात्र तपोवनात साधुग्राममध्ये बैठक बोलाविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)