आयटीआयच्या परीक्षा जानेवारीपासून आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:17 IST2017-07-30T01:17:25+5:302017-07-30T01:17:29+5:30
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता आयटीआय परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

आयटीआयच्या परीक्षा जानेवारीपासून आॅनलाइन
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता आयटीआय परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जानेवारी २०१८पासून अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातील शासकीय आयटीआयचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) आधुनिकीकरण होत असून, ही निश्चित कौतुकाची बाब असल्याचे राजीव प्रताप रुडी म्हणाले.