शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:46 IST

राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली. या इनकमिंगला मेगा भरती असं नावही देण्यात आलं होतं. विरोधी पक्षांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने काठावर असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली ताकद वाढवली. मात्र ही ताकद सत्तास्थापनेसाठी भाजपला पुरेशी ठरली नाही. मात्र जे नेते मंत्रीपदाच्या किंवा विधान परिषदेच्या आश्वासनांवर भाजपमध्ये दाखल झाले, त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. 

भाजपचीच सत्ता येणार असे ओपिनियन पोल आल्यानंतर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 30 हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश होता. तर काही नेते पक्षात मोठ्या पदावर होते. या सर्व नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने राज्यात वर्चस्व निर्माण केले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने आयारामांना विधान परिषदेचे आश्वासन दिले होते. तर नाराजांना देखील हेच आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे  भाजपमधून तिकीटासाठी बंडखोरी झाली नाही. जी काही बंडखोरी झाली, ती शिवसेनेला दिलेल्या मतदारसंघात झाली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत सबुरीने घेणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेचे वेध लागले. त्यानुसार या नेत्यांची तयारी होती. यापैकी अनेक नेते दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

2020 मध्ये विधान परिषदेच्या 26 जागा रिक्त होणार आहे. शिवसेना-भाजपची युती असती तर यातील किमान 13 जागा भाजपच्या वाट्याला येणार होत्या. मात्र आता सर्वच राजकीय समिकरण बदलले आहे. याचा लाभ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या इच्छूकांना होणार असून विधान परिषदेवर निवडून येण्याची खात्री झाली आहे. तर भाजपकडून विधान परिषदेच्या आश्वासनांवर विधानसभेत गप्प बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे.