अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जागृती

By Admin | Updated: June 27, 2016 02:32 IST2016-06-27T02:32:47+5:302016-06-27T02:32:47+5:30

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने कल्याण- डोंबिवलीत शनिवारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

Awareness on the Day of Atomic Diet | अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जागृती

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जागृती


कल्याण : अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने कल्याण- डोंबिवलीत शनिवारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. डोंबिवलीत रामनगर, मानपाडा पोलीस आणि ईगल ब्रिगेड यांच्या वतीने लोढा हेवन परिसरातील रामभाऊ भिसे बालविकास मंदिर महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली. तर, कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली.
लोढा हेवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाटगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्वनिफ ीत-चित्रफितीद्वारे तसेच विविध पोस्टर, बॅनर्सच्या माध्यमातून संदेश देताना त्यांनी मुलांशी संवाद साधला. बाजारात उपलब्ध असलेल्या अमली पदार्थांची ओळख करून देत त्यांनी त्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली. ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी पालकांना मुलांच्या हालचालींवर तसेच त्यांच्या मित्रांच्या संगतीवर लक्ष ठेवून त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. या वेळी शाळेच्या संचालिका सुलभा कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. पथनाट्यांतूनही अमली पदार्थ सेवनाचा विषय मांडण्यात आला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोड शो झाला. याला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ब्रिगेडच्या दामिनी पथकातील तेजस्विनी कापडणे, अरुणा बेंद्रे, सुनीता शिंदे, जया सुब्रह्मण्यम, रेखा मेनन, गौरी पांचाळ, नीता गवस, विजया शिरोडकर, प्रज्ञा पेडणेकर, सुप्रिया दुस्तकर, नितेश चांदसकर यांचा तसेच ईगल ब्रिगेड पोलीसमित्र सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Awareness on the Day of Atomic Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.