पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळते : झंवर

By Admin | Updated: April 30, 2016 00:45 IST2016-04-30T00:45:26+5:302016-04-30T00:45:26+5:30

विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी लोककल्याणासाठी कार्य केले. त्यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळते, असे उद्गार मधुसूदन झंवर यांनी काढले.

The award gets inspiration: Zanor | पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळते : झंवर

पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळते : झंवर

पुणे : डॉ. मणिभाई देसाई कर्मयोगी होते. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी लोककल्याणासाठी कार्य केले. त्यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्कारामुळे स्फूर्ती मिळते, असे उद्गार मधुसूदन झंवर यांनी काढले.
डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रीय पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे, उपाध्यक्ष डॉ. अशोक पाटील आदी उपस्थित होते.
पुरस्कारार्थींमध्ये मिलिंद चौधरी, रणजितसिंह पाटील, भागवत झोपे, डॉ. एल. झेड. पाटील, अ‍ॅड. शिवाजी धुमाळ, मनोहर मिरजे, डॉ. स्मिता घुले, डॉ. विनायक रवाडे, दिनकर चौधरी, डॉ. आर. के. पाटील, डॉ. अभिजित दाणाईत, डॉ. सुरेश गोरेगावकर, शिरीश वाघमोडे, रघुनाथ फेगडे, डॉ. के. जी. पाटील, सुधीर पारकर, ललिता समदूरकर, ज्योतीराव, डॉ. नितीन पाटील, शंकर देवकर, शांताराम कोलते, डॉ. तनुजा वाणी, शंकर चव्हाण, दिनेश यादव, बाबूभाई गुगळे, कौस्तुभ शहा, नारायण वाडिया, अ‍ॅड. रमेश उमरगे यांचा समावेश आहे.

Web Title: The award gets inspiration: Zanor