सजग राजकारण म्हणजे विवेकवाद पुढे नेणे

By Admin | Updated: August 11, 2015 01:10 IST2015-08-11T01:10:51+5:302015-08-11T01:10:51+5:30

राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत

Awakening politics is to carry forward discrimination | सजग राजकारण म्हणजे विवेकवाद पुढे नेणे

सजग राजकारण म्हणजे विवेकवाद पुढे नेणे

पुणे : राजकारण आणि विवेकाचा काही संबंध नाही, असे दाखविले जाते. मात्र राजकारणात सजग असणे हे विवेकवाद पुढे नेण्याचे काम असून भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत
डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय विवेकवाद्यांच्या राष्ट्रीय परिषदेचा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या(अंनिस) रौप्य वर्षपूर्ती अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. राज्याच्या विविध भागातील सुमारे अकराशे स्त्री- पुरु ष कार्यकर्ते उपस्थित होते. अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रदेश प्रधान सचिव माधव वाबगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख तसेच प्रदेश कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, संजय बनसोडे यांच्यासह शैला दाभोलकर, मनीषा महाजन आणि महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ आदी मंचावर होते. (प्रतिनिधी)

भोंडला, दहीहंडी, सामूहिक अथर्वशीर्ष
विद्या बाळ म्हणाल्या, महिलांनी अनावश्यक गोष्टींऐवजी उपयुक्त, आवडीच्या आणि गंभीर गोष्टींसाठी वेळ द्यायला हवा. भोंडला, दहीहंडी, सामूहिक अथर्वशीर्ष अशा धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या शक्तिप्रदर्शनात सहभागी व्हायचे की नाही याचा विवेक जागवावा. विवेकाला काळिमा फासणारे काही घडत असेल तर त्याला विरोध करायला हवा.

Web Title: Awakening politics is to carry forward discrimination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.