शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ, पालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:56 IST

मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू केली आहेत.

पुणे  - मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू केली आहेत. मात्र पुणे शहरातील अनेक मदत केंद्रांमध्ये पालकांना अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे.आरटीई प्रवेशासाठी आरटीईच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झालेली आहे. पुणे जिल्ह्यात ९३ मदत केंद्र सुरू केले आहेत. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये हे केंद्र आहेत. त्यांची यादी आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मदत केंद्राचे नाव, संपर्क पत्ता, समन्वयकांचा मोबाईल नंबर व लँडलाइन फोन नंबर आदी माहिती दिलेली आहे. मात्र या मदत केंद्रातील समन्वयकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता आरटीई अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.समन्वयक शक्यतो फोन उचलत नाहीत. कोथरूडच्या पंडित दीनदयाळ शाळेतील शिक्षिका अरुणा रजनी यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. औंधच्या इंदिरा प्राथमिक विद्यालयाच्या समन्वयक म्हणून ललिता जाधव या निवृत्त झाल्या असतानाही त्यांचे समन्वयक नाव दिले आहे. हडपसर गाडीतळ येथील महात्मा फुले विद्यालयाच्या समन्वयकांनी ‘मुंढव्यात राहत असाल तरच अर्ज भरेन’ असे सांगितले.अहिल्यादेवी होळकर स्कूलच्या शिवाजी बोखरे यांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. शिक्षण विभागाने मदत केंद्रांवर संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध आहेत का याची खातरजमा केलेली नाही. शिक्षकांना आरटीई अर्ज कसा भरायचा याबाबतही नीट माहिती नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी संगणकामध्ये बिघाड झाला असून सायबर कॅफेत जाऊन अर्ज भरा असा अनाहूत सल्ला दिला जात आहे.शिक्षण संचालक, सहसंचालकांचे दुर्लक्षआरटीई मदत केंद्रातून अर्ज भरण्याबाबत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना याबाबत पालकांनी शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहसंचालक दिनक टेमकर, उपसंचालक मीनाक्षी राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाहीत. ‘सर एनआयसीमध्ये बैठकीला गेले आहेत’ एवढे एकच उत्तर त्यांच्या कार्यालयातून दिले जात आहे. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षामुळेच पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.बार्टीच्या समतादूतांचे कौतुकास्पद कामराज्य शासनाच्या मदत केंद्रांमधून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात असतानाच दुसरीकडे बार्टीच्या समतादूतांकडून मात्र शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये फिरून आरटीईचे अर्ज भरून घेण्याचे कौतुकास्पद काम सुरू आहे. त्यांनी राज्यभरातून आतापर्यंत ११ हजार ३३७ अर्ज पालकांना भरून दिले आहेत. पुणे शहरातून ७१० आरटीईचे अर्ज भरले गेले आहेत.हद्दीचा वाद घालून असहकार्याचे प्रकारआरटीई मदत केंद्रातून आरटीईचे अर्ज आॅनलाइन भरायचे आहेत, त्यामुळे कुठूनही कुठल्याही विद्यार्थ्याचा अर्ज भरता येणे शक्य आहे. मात्र मदत केंद्रातील समन्वयक अर्ज भरण्याचे टाळण्यासाठी हद्दीचा वाद घालत आहेत.‘तुम्ही राहता ते ठिकाण माझ्या हदद्ीत येत नाही’ असे सांगून मदत केंद्रातील समन्वयकांकडून अर्ज भरण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पालक हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे