शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

गैरसोय टाळण्यासाठी चेकऐवजी ऑनलाइन वीजबील भरा, महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:44 IST

 वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी (चेक) महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

मुंबई : वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी (चेक) महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा केल्यास कोणत्याही कारणामुळे धनादेश बाऊंस होण्याची शक्यता असते.  सद्यस्थितीत महावितरणचे दरमहा सुमारे 7 लाख ग्राहक वीज बिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. त्यापैकी साधारणत: 10,000 धनादेश दरमहा बाऊंस होतात. त्यामुळे ग्राहकांना 350 रुपये दंड, धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास पुढील बिलात लागून येणारी थकबाकी यासह सदर ग्राहकाची पुढील सहा महिने धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते. तसेच धनादेश बाऊंस होणे हा पराक्राम्य संलेख 1881 च्या कलम 138 अंर्तगत दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे. 

रिर्झव्ह बँकेच्या नियमांप्रमाणे, धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश वटल्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद ग्राहकांच्या खात्यावर होते. अनेक ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसा अगोदर धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा  झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊंस झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. काही ठिकाणी एखादी व्यक्ती 15 ते 20 वीजग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम रोख स्वरुपात घेऊन ती धनादेशाद्वारे भरते. यात धनादेश बाऊंस झाल्यास त्याचा वीजग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसू शकतो व त्यांचा वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो. 

या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी व घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अॅपच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुमारे 35 लाख वीजग्राहक सुमारे 600 कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणonlineऑनलाइन