पावसाने गाठली २ महिन्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:27 IST2016-07-20T00:27:00+5:302016-07-20T00:27:00+5:30

जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने जुलैै महिन्यात कृपादृष्टी दाखवीत दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली आहे

Average rainfall of 2 months reached | पावसाने गाठली २ महिन्यांची सरासरी

पावसाने गाठली २ महिन्यांची सरासरी


पुणे : जून महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजाने जुलैै महिन्यात कृपादृष्टी दाखवीत दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५६१४.५ मिमी एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ४३१ मिमी इतका आहे. गेल्या आठ दिवसांपासून उघडीप सुरू असल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे.
जुलै महिन्याच्या १९ दिवसांत सरासरी ३५0 मिमी पाऊस पडला आहे. गेली आठ दिवस तो अधूनमधून जोर धरत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात १३ जुलैैपर्यंत सुमारे ६७ हजार क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्या टक्केवारीत २९ टक्के इतक्या होत्या. आता आठवडाभर उघडीप सुरू असल्याने पेरण्या ६0 ते ७0 टक्केपर्यंत गेल्याची शक्यता आहे. भातशेतीला हा पाऊस अत्यंत उपयुक्त असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतकरी भातलावणीत व्यस्त आहेत.
जून व जुलै महिन्यात पुण्यात सरासरी ४३८.१ मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) देशात आणि महाराष्ट्रातही उशिरा आगमन केले. त्यामुळे तो उशिरा दाखल झाला. जून महिन्याचा शेवटचा आठवडा वगळता संपूर्ण महिना कोरडा गेला. जून महिन्यात शहरात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्याही रखडल्या. जुलै महिना पाऊस घेऊन आला. आतापर्यंत जिल्ह्यात ५६१४.५ मिमी एवढा पाऊस झाला आहे. जून महिन्याचा बॅकलॉग पावसाने आता भरून काढला आहे.

Web Title: Average rainfall of 2 months reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.