शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:40 IST

महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्ल्क असल्याने राज्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.

महाराष्ट्रासमोर पाणीसंकट उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिना उलटला नाही आणि पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.

राज्यात एकूण २ हजार ९९७ धरणे आहेत, ज्यात लहान ते मोठ्या संरचनांचा समावेश आहे, ज्यांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता ४० हजार ४९८ दशलक्ष घनमीटर आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातील धरणांत फक्त ३० हजार ०३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांत ३५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. हे प्रमाण किंचित चांगले असले तरी अधिकारी सावध आहेत.

अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा राज्य सरकार ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ७ एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या २२३ टँकर कार्यरत आहेत, जे १७८ गावे आणि ६०६ वाड्यांमध्ये पाणी पोहोचवत आहेत.

कुठे किती पाणी शिल्लक?दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती ५०.०९ टक्के पाणीसाठ्यासह सर्वात स्थिर स्थितीत आहे. जुलैल्या मध्यपर्यंत अमरावतीकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असे सांगण्यात येत आहे. कोकणात ४९.९६ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर, नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे ४१.४९ टक्के आणि ४३.९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाड्यातील जलशयांची पाण्याची पातळी ४०.४९ टक्क्यांवर घसरली आहे.

नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहनवाढते तापमान आणि पावसाला अजून वेळ असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. तर, अधिकारी सर्व प्रदेशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातMaharashtraमहाराष्ट्र