राज्याच्या कमाल तापमानात सरासरी वाढ
By Admin | Updated: March 10, 2015 04:19 IST2015-03-10T04:19:28+5:302015-03-10T04:19:28+5:30
मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येऊ लागली असून, प्रमुख शहरांचे

राज्याच्या कमाल तापमानात सरासरी वाढ
मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येऊ लागली असून, प्रमुख शहरांचे सरासरी कमाल तापमान ३५ अंशांवर गेले आहे. शिवाय मुंबई शहराच्या कमाल तापमानानेही ३२ अंशांपर्यंत मजल मारली असून, हे कमाल तापमान मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे २८ अंशांवर घसरले होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. शिवाय मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. शिवाय १०, ११, १२ आणि १३ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. तर पुढील ४८ तासांत मुंबईतील आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान
३४ अंशांच्या घरात नोंदविण्यात
येईल. (प्रतिनिधी)