शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पशू, पक्ष्यांसाठी मासिक ७ हजारांची पदरमोड करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 17:49 IST

जखमेमुळे विव्हळत पडलेल्या जवळपास २०० पक्ष्यांवर उपचार करुन जीवनदान दिले आहे.

लातूर : माणूस स्व-केंद्री झाल्याने दुसऱ्यांच्या सुख- दु:खात सहभागी होत नाही, याची प्रचिती बहुतांश मंडळींना येते. परंतु, लातुरातील महेबूब चाचा हे मुक्या पशू, पक्ष्यांसाठीच जगत आहेत. जखमेमुळे विव्हळत पडलेल्या जवळपास २०० पक्ष्यांवर त्यांनी उपचार करुन जीवनदान दिले आहे. पक्ष्यांसाठी मासिक ७ हजार रूपयांची ते पदरमोड करीत असल्याने त्यांच्या घरी किलबिलाटच असतो.

शहरातील मळवटी रोडवरील बुऱ्हाणनगरात राहणाऱ्या महेबूब इसाक सय्यद यांचे पत्र्याचे घर आहे. बालपणापासूनच ते पशू- पक्षांत रमायचे. आजघडीला त्यांच्या घरी हंस, ससे, चिनी कोंबड्या, कबुतरे, साळुंक्या, बुलबुल, चिमण्या, कावळे आदी पक्ष्यांची १०० पेक्षा जास्त घरे आहेत. त्यांचे घर हे ४० बाय ४० चौ. मी. चे असून पक्ष्यांसाठीच त्यांनी १५ बाय ४० चौ. मी. जागा खुली ठेवली आहे. त्यात त्यांनी विविध फळांच्या झाडांची लागवड केली आहे. पक्ष्यांसाठी घरात ५० पेक्षा जास्त पाण्याच्या कुंड्या, अन्नासाठी भांडी बांधले आहेत.

पशू, पक्ष्यांच्या पाण्यासाठी काढले कर्जपशूधनासाठी त्यांनी पाण्याचे हौद बांधले आहेत. परंतु, २०१४ मध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने काही पशूधन पाण्याविना परतत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी ७० हजारांचे खाजगी कर्ज काढून बोअरवेल खोदली. सुदैवाने १८० फुटावर ४ इंच पाणी लागले आणि पाण्याची अडचण दूर झाली.

‘राजकुमार’ दगावला अन् ढसाढसा रडलेतीन वर्षांपूर्वी आजाराने त्रस्त असलेला कुत्रा आढळून आला. त्यांनी त्यास घरी आणून उपचार केले. त्यानंतर त्याचे राजकुमार असे नाव ठेवले. कुत्रा आणि ससा, मांजर असे प्राणी एकमेकांचे शत्रू परंतु, राजकुमार नावाचा श्वान आणि इतर प्राणी हे जणू मित्रच झाले होते. गुरुवारी दुपारी महेबूब चाचा वृक्षांना पाणी देत असताना तोंडात फेस आलेला राजकुमार (श्वान) त्यांच्या पायात येऊन पडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, निपचित पडलेला राजकुमार पाहून ते ढसाढसा रडले. त्यानंतर सावरत त्यांनी मयत व्यक्तीचा ज्या प्रमाणे अंत्यसंस्कार केला जातो, त्याच पध्दतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यlaturलातूरsocial workerसमाजसेवक