वाद आत्मचरित्रंचा!
By Admin | Updated: November 15, 2014 23:33 IST2014-11-15T23:33:58+5:302014-11-15T23:33:58+5:30
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक खेळाडूंची आत्मचरित्रे वादग्रस्त ठरली. त्यावर एक नजर..

वाद आत्मचरित्रंचा!
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक खेळाडूंची आत्मचरित्रे वादग्रस्त ठरली. त्यावर एक नजर..
जिम लेकर इंग्लंडचा लेग-स्पिनर जिम लेकर याने 1951 साली ‘स्पिनिंग राऊंड द वल्र्ड’ आणि 196क् साली ‘ओव्हर टू मी’ हे आत्मचरित्र लिहिले. त्याने इंग्लंड व सरे याचा कर्णधार पीटर मे आणि सरे कौंटी व्यवस्थापनावर टीका केली.
आंद्रे अगास्सी
अमेरिकेचा टेनिसपटू आंद्रे अगास्सी याने ‘ओपन’ या नावाने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले. हे पुस्तक नोव्हेंबर 2009मध्ये प्रसिद्ध झाले. आंद्रेने या पुस्तकातून आपण अमली पदार्थाचे सेवन करीत होतो असा गौप्यस्फोट केल्याने सर्वत्र गदारोळ उठला.
इयान बॉथम
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथमने ‘हेडऑन’ आत्मचरित्रत ड्रगच्या अधीन झाल्याची कबुली दिली. शिवाय मैदानाबाहेरील जीवनाची बाजूही उघड केली.
हर्षेल गिब्ज
दक्षिण आफ्रिकेचा हर्षेल गिब्ज याचे हर्षेल गिब्ज - टू द पॉइंट (द नो-होल्डस-बार्ड-अॅटोबायोग्राफी) हे पुस्तक. आपण बॅड बॉय कसे होतो, दारूचे व्यसन कसे लागले, असा काही वादग्रस्त उलगडा त्याने पुस्तकरूपाने केला. फिक्सिंगबाबत त्याने फारसे खुलासे केले नाही.
अॅडम गिलािस्ट
ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलािस्ट याने 2008मध्ये निवृत्ती घेतली आणि त्याच वर्षाच्या शेवटी त्याने ‘ट्र कलर्स’ हे आपले आत्मचरित्र आणले. या पुस्तकामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा भारतात अधिक गदारोळ उठला.
मिल्खा सिंग
ऑलिम्पिक धावपटू मिल्खा सिंग यांच्या ‘दि रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रवर राकेश ओमप्रकाश मेहरा याने 2क्13मध्ये ‘भाग मिल्खा भाग’ची निर्मिती केली. अभिनेता फराहन अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका केली. 3क् कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या सिनेमाने 1क्क् कोटींहून अधिक कमाई केली. सुपरहीट ठरलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ला अनेक पुरस्कार मिळाले.
मेरी कोम
ऑलिम्पिकपदकविजेती महिला बॉक्सर मेरी कोमवरही बॉलिवूडमध्ये सिनेमा आला. मेरी कोमच्या आत्मचरित्रवर आधारित या सिनेमात प्रियंका चोप्रा हिने
मेरी कोमची भूमिका केली.
या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई
केली.
पान सिंग तोमर
सात वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेला धावपटू पान सिंग तोमर याच्या जीवनावर आधारित 2क्1क्मध्ये हिंदी सिनेमा येऊन गेला. लष्कारात जवान असलेला पान सिंग तोमर परिस्थितीमुळे कसा दरोडेखोर बनतो हे या सिनेमाचे मुख्य कथानक. या सिनेमाला 2क्12मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि इम्रान खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
आगामी
आकर्षण
ऑलिम्पिक सुवर्णपदक
नेमबाज अभिनव बिंद्रा आणि हॉकीपटू सरदार सिंग यांच्यावर सिनेमा तयार केला जात आहे. बिंद्रा याच्या ‘ए शॉट अॅट हिस्ट्री’ या आत्मचरित्रवर हा सिनेमा तयार केला जाणार असून, यात अमेरिकन कंपनीने रस दाखवला आहे. तर सरदार सिंग याच्यावरील सिनेमात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका करणार आहे.