शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

रिक्षाचालकांनो, आता २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करा अन् दीड हजार अनुदान मिळवा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 05:27 IST

कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते.

मुंबई : कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने दीड हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. अनुदान वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ मेपासून रिक्षाचालकांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते. त्यात परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचे ठरले हाेते. यासंदर्भत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला हाेता.  रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. ही माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. याची कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. २२ मे पासून रिक्षाचालकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली.

निधी राज्य सरकारकडून उपलब्धअनुदानासाठी आवश्यक सर्व निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्वरित जमा होणार असल्याची माहितीही परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार