शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

नव्या मनोऱ्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांची ‘अधिकृत’ सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:23 AM

८५० कोटी रुपयांचा खर्च । प्रत्येक आमदारास मिळणार १,०३२ चौरस फुटांचा कक्ष

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनोरा आमदार निवासाची सध्याची इमारत पाडून त्या ठिकाणी ३४ मजल्यांचे दोन टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंतचे कार्यकर्ते आमदारांच्या खोल्यांवर नेहमीच गर्दी करतात आणि प्रसंगी आमदारांनाही आक्रसून वावरावे लागते. मात्र, आता तसे होणार नाही. कार्यकर्ते, पाहुणे आणि एकूणच अभ्यागतांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नव्या मनोºयात करण्यात येणार आहे.

सध्याच्या मनोऱ्यामध्ये एकूण ३३६ कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ हे ३३२ चौरस फूट आहे. त्यातच आमदार स्वत:ची वेगळी खोली करून घेतात आणि समोरच्या खोलीत कार्यकर्ते, पाहुणे यांची वर्षभर गर्दी असते. समोरची खोली भरली की काही जणांना आपल्या खोलीत जागा दिल्याशिवाय आमदारांनाही पर्याय नसतो. आमदारांच्या अगदी जवळचे लोक त्यांच्या खोलीत आणि बाकीचे समोरच्या खोलीत असे वर्गीकरण बरेचदा केले जाते. त्यातून मानापमान नाट्येही रंगतात. कार्यकर्त्यांना अनेकदा दाटीवाटीने झोपावे लागते. ही गैरसोय आता टळणार आहे.

उपचारांसाठी नातेवाईक वा आप्तेष्टास घेऊन आलेले कार्यकर्ते, मुंबईत शिकायला आलेले विद्यार्थी, मुंबई बघण्यासाठीआलेले गावाकडील कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंब अशा तºहेतºहेच्या लोकांनी आमदारांच्या खोल्या हाउसफुल्ल असतात. आता नवीन मनोरा आमदार निवासात प्रत्येक आमदारास तब्बल १ हजार ९० चौरस फुटांचा कक्ष मिळणार आहे. त्यातील ६८२ चौरस फूट जागा ही आमदारांसाठी असेल तर ४१८ चौरस फूट जागा ही अभ्यागतांसाठी राहील. एकूण ३७६ कक्ष असतील. सध्या १४ मजल्यांचे चार टॉवर आहेत.

नवे मनोरा आमदार निवास हे ८५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. उभारणीचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन करणार आहे.असे असेल नवे मनोराएकूण बांधकाम : ७.७२ लाख चौरस फूटएकूण कक्ष संख्या : ३७६वाहनतळ : ५८१ कारसाठीसभागृह : आसन क्षमता २४०क्षेत्रफळ : ४ हजार चौ. फूटयाशिवाय, दवाखाना, बँक, ९ दुकाने, ३ भोजनकक्ष, मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था, एक जिमखाना, एक योगकक्ष, एक वाचनालय, एक छोटे थिएटर. २ कँटिन