शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राजकारणाच्या अंगणापासून लेखक अलिप्तच.. पक्षांपासूनही दूरावाच...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:00 IST

कोणत्याही राजकीय विचारधारेचा अंगिकार करून त्याचा उघडपणे प्रचार करणाऱ्या साहित्यिकांची संख्या हाताच बोटावर मोजण्याइतकीच आहे.

ठळक मुद्देसाहित्यिकांना राजकीय निवडणुकांचे वावडेसंघर्ष टिकवण्यासाठी लेखकांचा उपयोग

राजू इनामदारपुणे : राजकारणाच्या अंगणापासून बहुसंख्य मराठी साहित्यिकांनी स्वत:ला अलिप्तच ठेवले आहे. कोणत्याही राजकीय विचारधारेचा अंगिकार करून त्याचा उघडपणे प्रचार करणाऱ्या साहित्यिकांची संख्या हाताच बोटावर मोजण्याइतकीच आहे. समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या साहित्यिकांमध्ये हा टोकाचा अलिप्ततावाद का? याचालेखकांकडेच शोध घेतला असला त्याला प्रामुख्याने राजकारणाचा बदललेला पोतच कारणीभूत असल्याचे दिसते. सत्तेचा मद व पैशाचा माज या दोन्ही गोष्टी राजकारणाचा अविभाज्य भाग झाल्या असून त्यातूनच हे काम आपले नव्हेच या न्यूनगंडाने बहुसंख्य साहित्यिकांना पछाडले असल्याचे निदर्शनास येते आहे. अनिल बर्वे हे एखाद्या राजकीय विचारधारेचे उघडपणे समर्थन करणारे मराठी साहित्यिकांमधले ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने बंदी घातलेल्या नक्षलवादाचे समर्थन त्यांनी केले. त्यावर आधारित थँक्यू मिस्टर ग्लाड, डोंगर म्हातारा झाला यासारख्या साहित्याची निर्मिती केली. मात्र अशा राजकीय विचारधारेचे समर्थन केल्याचा त्यांना बराच त्रास झाला. त्यामुळेच की काय, पण त्यानंतर कोणीही लेखक उघडपणे राजकारणात उतरलेला नाही. ग. दि. माडगूळकर काँग्रेस पक्षाचे काम करत, मात्र ते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतल्यानंतर. ना. धो. महानोर यांनाही ती संधी मिळाली, मात्र ते कधीही काँग्रेसच्या व्यासपीठावर आले नाहीत. द. मा. मिरासदार यांनी मात्र संघप्रणित अभाविपचे काम केले. रामदास फुटाणे यांनीही काँग्रेसबरोबर असलेले सख्य लपवले नाही, मात्र आपल्या वात्रटिकांमधून त्यांनी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांवर प्रहार केले आहेत, तरीही थेट निवडणूकीच्या किंवा प्रचाराच्या फडात ते कधी उतरलेले नाहीत. अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच का? या प्रश्नावर फुटाणे म्हणतात,एकही मराठी साहित्यिक फक्त लेखन करून जगत नाही, जगू शकत नाही हेच त्याचे कारण! कुठेतरी नोकरी करून कसाबसा संसार रेटत असलेला लेखक राजकारणाच्या धबडग्यात पडेल तरी कसा व कशासाठी?  संस्थाचालक राजकारणात असतील तर तो त्यांच्या प्रचारात त्यांनी दिलेले काम इमानइतबारे करणार व नंतर परत आपल्या विश्वात मग्न होणार! ते काम करताना दिसलेले विश्वच त्याच्यासाठी इतके भयंकर असते की त्यावरचा शब्दही कधी लेखनात येऊ नये याची काळजी तो घेतो, असा पापभिरू माणून राजकारणात येऊन करणार तरी काय?लेखक राजकारणात का नाहीत यावर प्रतिक पुरी या ताज्या दमाच्या नव्या लेखकाचे मतही काहीसे वेगळे आहे. लेखक राजकारणात येत नाहीत, निवडणुकांमध्ये दिसत नाहीत हे त्यांना मान्य आहे, मात्र त्याची कारणे त्यांच्या लेखी वेगळी आहेत. लेखकांची मते बहुधा सत्ताधाºयांच्या विरोधात असतीत. ती जाहीरपणे व्यक्त करण्याच्या फंदात तो पडत नाही. साहित्यामधून ते ती व्यक्त करत असतातच. जाहीरपणे मात्र ते तटस्थ राहणे पसंत करतात. तसे केल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत असते. प्रत्यक्ष राजकारणात बºयाच तडजोडी कराव्या लागतात, मतांना मुरड घालावी लागते. हे लेखकांच्या स्वभावात बसत नसल्यामुळेच ते राजकारणात उतरत नसावेत असे पुरी यांना वाटते.राजकारणावर कांदबरी लेखन करणारे विश्वास पाटील म्हणाले, राजकारणात विचारधारा राहिलेलीच नाही. सकाळी एक पक्ष व संध्याकाळी दुसरा पक्ष असे झाले आहे. लेखकाला संघर्ष करत जगावे लागते. हल्लीचे राजकारण पैशांचे झाले आहे. गरीबी हा लेखकाचा स्थायीभाव आहे. राजकारणासाठी तो पैसा आणणार कुठून? राजकीय पक्षांना नटनट्यांचे त्यातही हिंदी, मराठी नाहीच, महत्व वाटते, कारण त्यांना ग्लॅमरही असते व पैसाही असतो. लेखकांकडे या दोन्ही गोष्टी नाहीत व तो त्या कुठून आणूही शकत नाही. लेखक म्हणूनही त्याच्या प्रसिद्धीला मयार्दा असते. लेखकालाही हे माहिती असते. त्यामुळेच ह्यनको तो फंद आणि छंदही, बाजूला राहणेच चांगलेह्ण ही विचारधारा जोपासली जाते. 

संघर्ष टिकवण्यासाठी लेखकांचा उपयोगपरराज्यात, विशेषत: कर्नाटक मध्ये लेखक राजकारणात दिसतात याचे कारण सांगताना विश्वास पाटील म्हणाले, कर्नाटक राज्य शेजारच्या प्रत्येक राज्याबरोबर संघर्ष करत असते. हा संघर्ष कधी पाण्यावरून असतो तर कधी सिमारेषेवरून. हा संघर्ष तेथील राजकारण्यांना टिकवायचा असतो. १७ मंत्र्यांपेक्षा १७ लेखक अस्मितेला चांगली फूंकर घालतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे संघर्ष फुलता ठेवण्यासाठी म्हणून ते लेखकांना राजकारणाच्या मंचावर घेतात, मात्र फार पुढे जाऊ देत नाहीत. पक्षाचे धोरण वेगळ्या साहित्यिक भाषेत मांडणे हेच त्यांचे काम असते व तेच ते करतात. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यElectionनिवडणूकPoliticsराजकारण