शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 17:35 IST

नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर - राज्यात अलीकडेच औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे अनेक भागात हिंसाचार घडला. कोल्हापूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती उद्भवली. मात्र याच परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटू शकते. 

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगजेबाच्या समाधीला मी भेट दिली. इथं ऐतिहासिक वास्तू आहे ती बघायला आलो आहे. औरंगजेब राज्यावर ५० वर्ष राज्य करून गेला ती तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचे राज्य इथं आले का हे बाबासाहेबांनी सांगितलंय. जयचंद इथं आले होते. त्या जयचंदाला शिव्या घाला आणि औरंगजेबाला शिव्या का घालताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत मी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरेंची कोंडी अजिबात होणार नाही. कारण औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकांपासून आहे. महाराष्ट्राने पुढाकार घेऊन या भारताची दुसरी राजधानी हे औरंगाबाद, खुलताबाद करावी. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर २ दिवसांत दंगलीचा विषय निपटून टाकला असता. वादाचा विषय होऊन देता म्हणून होतो असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

देशाला गुलाम केले त्यांची निंदा करा खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा असंही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी