औरंगाबादची विजयी सलामी
By Admin | Updated: December 10, 2014 23:56 IST2014-12-10T22:02:07+5:302014-12-10T23:56:46+5:30
राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा : कुरूंदवाडमध्ये उद्घाटन

औरंगाबादची विजयी सलामी
कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६ व्या महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. उद्घाटनापूर्वी झालेल्या सलामी सामन्यात पुरुष गटातील औरंगाबाद विरुद्ध लातूर सामन्यात २५-१६, २५-१६ अशा सरळ दोन सेटमध्ये २ विरुद्ध ० ने पराभव करत औरंगाबाद संघाने विजयाची सलामी दिली.
येथील तबक उद्यानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानावर एकूण चार नेट लावण्यात आले असून याठिकाणी पुरुष, तर साने हायस्कूलच्या मैदानामधील नेटवर महिला संघाच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय असे एकूण ३५ पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत.
आज, बुधवारी एकूण पुरुष व महिलांची एकूण १३ सामने झाले. त्यापैकी उद्घाटनापूर्वी आठ सामने झाले. यामध्ये सातारा विरुद्ध सांगली या लढतीत सांगलीने ही लढत २५-१६, २२-२५,२५-१३ अशी जिंकली. अन्य लढती व गुण पुढीलप्रमाणे -
सोलापूर विरुद्ध नंदूरबार - २५-११, २५-१६ = २-० गुणाने सोलापूर विजयी. अमरावती विरुद्ध पालघर - २५-१८, २५-१८ = २-० गुणाने अमरावती विजयी. रत्नागिरी विरूद्ध हिंगोली - २५-२३, १७-२५, १५-११ = २-१ गुणाने हिंगोली विजयी.
महिला संघ -
सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग - २५-१६, २५-०६ = २-० गुणाने सातारा विजयी. ठाणे विरुद्ध औरंगाबाद - २५-०४, २५-०८ = २-० गुणाने ठाणे विजयी. बीड विरुद्ध वर्धा - २५-२०, २५-२१ = २-० गुणाने बीड विजयी. (वार्ताहर)
स्पर्धेवर ३५ पंचांची नजर
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय असे एकूण ३५ पंच उपस्थित आहेत. आंतरराष्ट्रीय पंच - इजाज शेख (पुणा), अनिल गिराम (सोलापूर), अंजली सरदेसाई (पुणा). राष्ट्रीय पंच - रामानंद गोसावी (कोल्हापूर), मंजूषा भिडे (जळगाव), नारायण उपलचवार (नांदेड), पी. आर. सावंत (मुंबई), एस. डी. आचरेकर (मुंबई), आदिनाथ कोल्हे (अहमदनगर)
कुरुंदवाड येथे ४६ वी महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील औरंगाबाद विरुद्ध लातूर यांच्यात रंगलेल्या सामन्यातील एक क्षण.