औरंगाबादेत विराट मोर्चा
By Admin | Updated: February 14, 2015 03:48 IST2015-02-14T03:48:57+5:302015-02-14T03:48:57+5:30
केबीसीच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करा,’ ‘आमच्या घामाचा पैसा हक्काने घेऊ’, ‘आमचे पैसे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’

औरंगाबादेत विराट मोर्चा
औरंगाबाद : ‘केबीसीच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करा,’ ‘आमच्या घामाचा पैसा हक्काने घेऊ’, ‘आमचे पैसे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत राज्यभरातील ठेवीदारांनी शुक्रवारी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. मोर्चापूर्वी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला.
मोर्चा आणि मेळाव्यासाठी किनवटसारख्या दुर्गम भागातून ठेवीदार आले होते. हातात काठी धरून चालणाऱ्या वृद्ध महिलाही आल्या होत्या. गर्दीमुळे सभागृह अपुरे पडले होते़
समितीचे अध्यक्ष करण गायकर म्हणाले की, केबीसीची संपत्ती शासनाने जप्त केली आहे़ तिचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांचे पैसे वाटून देण्यात यावे. जोपर्यंत केबीसीचे मुख्य भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांना अटक होत नाही, तोपर्यंत अन्य संचालकांना जामीन देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. मेळाव्यानंतर मोर्चा काढून विभागीय उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.