औरंगाबादमध्ये २ ट्रकची टक्कर होऊन लागली भीषण आग, ४ ठार
By Admin | Updated: July 16, 2015 11:56 IST2015-07-16T10:23:39+5:302015-07-16T11:56:19+5:30
औरंगाबादमधील अंजिठा पोलिस स्थानकासमोर दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रकने पेट घेतल्यामुळे ४ जण ठार झाले.

औरंगाबादमध्ये २ ट्रकची टक्कर होऊन लागली भीषण आग, ४ ठार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १६ - शहरातील अंजिठा पोलिस स्थानकासमोर दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रकने पेट घेतल्यामुळे ४ जण ठार झाले. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. अजिंठा गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे बांबूची वाहतूक करमा-या ट्रकने पेट घेकला व चार जणांचा होरपळू मृत्यू झाला. तसेच तीन जण जखमीही झाले. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.