औरंगाबाद - रॅगिंगला कंटाळून विद्यार्थिनीची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
By Admin | Updated: June 17, 2016 10:39 IST2016-06-17T09:45:11+5:302016-06-17T10:39:40+5:30
रॅगिंग तसंच मैत्रिणींसोबतच्या विसंवादातून रेल्वेखाली उडी मारुन 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

औरंगाबाद - रॅगिंगला कंटाळून विद्यार्थिनीची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. 17 - रेल्वेखाली उडी मारुन 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतीक्षा मोतीराम वाघ असं या तरुणीचं नाव आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी होती. रॅगिंग तसंच मैत्रिणींसोबतच्या विसंवादातून प्रतीक्षाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा संशय आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार हॉस्टेलमध्ये मैत्रिणींकडून होणारी रॅगिंग, सततचा छळ, चोरीच्या आरोपाला कंटाळून प्रतीक्षाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने मैत्रिणीला मेसेजही केला होता. प्रतीक्षा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती.
प्रतीक्षाच्या मैत्रिणींनी रॅगिंग करुन माझ्या मुलीला त्रास दिला, त्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचा असा आरोप प्रतीक्षाचे वडील मोतीराम वाघ यांनी केला आहे.