औरंगाबादच्या सागरने जिंकली गोवा स्विमथॉन!
By Admin | Updated: April 8, 2017 20:16 IST2017-04-08T20:16:46+5:302017-04-08T20:16:46+5:30
बांबोळी बीचवर सुरू असलेल्या सातव्या गोवा स्विमथॉन स्पर्धेतील पहिल्या दिवशी औरंगाबादचा (महाराष्ट्र) जलतरणपटू सागर बडवे याने १० किमीची शर्यत जिंकली.

औरंगाबादच्या सागरने जिंकली गोवा स्विमथॉन!
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 8 - बांबोळी बीचवर सुरू असलेल्या सातव्या गोवा स्विमथॉन स्पर्धेतील पहिल्या दिवशी औरंगाबादचा (महाराष्ट्र) जलतरणपटू सागर बडवे याने १० किमीची शर्यत जिंकली. महिला गटात बंगळुरूच्या वाणी एम्बर हिने १० किमीची शर्यत आपल्या नावे केली. सागर बडवे याने २ तास ४६ मिनिटे २७ सेकंदांची वेळ दिली. वाणी हिने ३ तास ४६ मिनिटांची वेळ दिली. स्पर्धा एडुरो स्पोर्टसने आयोजित केली आहे.
पुरुषांच्या ५ किमी शर्यतीत ठाणे येथील मयांक छाफेकरने १:१४:३७ अशी वेळ देत पहिला क्रमांक मिळवला. महिला गटात बंगळुरूच्या निकिता एस.व्ही. हिने १:२२:२४ अशी वेळ देत बाजी मारली. पहिल्यी दिवशी ५ किमी, १० किमी अशा आॅलिम्पिक गटातील शर्यती झाल्या. दुसऱ्या दिवशी २ किमी, १ किमी आणि २४० मीटर शर्यती होतील.निकाल असा : १० किमी (पुरुष)- सागर बडवे २:४६:२७ (औरंगाबाद), पुनीत (हैदराबाद) ३:३८:०५, राकेश कदम (वसई) ३:४०:३७. १० किमी (महिला)- वाणी एम्बर (बंगळुरू) ३:४६:००, अरुणा वेणुगोपाल (बंगळुरू) ४:०८:१८, सारा एडवर्ड्स (अमेरिका) ४:२०:२३. ५ किमी (पुरुष)- मयंक छाफेकर (ठाणे) ०१:१४:३७, प्रभात कोली (मुंबई) १:१५:१६, देबमाल्या भट्टाचार्य (हुगळी) १:२८:१६, ५ किमी (महिला)-निकिता एस.व्ही. (बंगळुरू) १:२२:२४, मेल्रिन मार्टिनेली (बंगळुरू) १:२२:२४, पूजा बर्ठाकूर (कोची) २:०७:१७.