औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'
By Admin | Updated: May 20, 2016 00:50 IST2016-05-19T13:52:25+5:302016-05-20T00:50:26+5:30
रफिक शेख या पोलिस कॉन्स्टेबलने अथक प्रयत्नांनंतर एव्हरेस्ट शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातले पहिला एव्हरेस्टवीर ठरले.

औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर'
दोन वेळेस हुलकावणी
दोन वर्षांपूर्वी बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेल्या रफिकच्या चढाईला सुरूवात होते न होते तोच हिमस्खलन झाले त्यात १६ शेरपा मृत्युमुखी पडले. एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासातील ती पहिलीच सर्वात मोठी मनुष्यहानी होती. त्यामुळे नेपाळ सरकारने वर्षभरातील सर्व मोहिमा रद्द केल्या. तेव्हा रफिकलाही माघारी फिरावे लागले. पुढच्या वर्षी पुन्हा जय्यत तयारीनिशी रफिक या मोहिमेवर गेला. मात्र २४ एप्रिल २०१५ ला काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे सागरमाथा हादरला व बेस कँपवर हिमकडा (आईस वॉल) कोसळून झालेल्या अपघातामुळे त्याला पुन्हा परतावे लागले. पहिल्या दोन्ही वेळी कर्ज काढून, वेगवेगळ्या लोकांची मदत घेऊन त्याने मोहीम आखली. पण दोन्ही वेळा प्रत्येकी १५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले
घर काढले होते विक्रीला
नैसर्गिक आपत्तींमुळे सलग दोन वर्षे मोहिमेवरून परत यावे लागलेल्या रफिकला जिद्द पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३० लाखांची झळ सोसावी लागली होती़. तिस-या वर्षीही एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय कायम होतं. मोहिमेसाठी निधी उभा कसा करायचा म्हणून त्याने नायगाव (ता़ औरंगाबाद) येथील त्याचे घर विकण्याची तयारी केली होती़. दानशूर मंडळींनी तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे त्याने जिद्द सोडली नव्हती़. अखेर आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.