औरंगाबाद - वडिलांना अटक केली म्हणून मुलाची आत्महत्या
By Admin | Updated: June 9, 2016 16:41 IST2016-06-09T16:41:18+5:302016-06-09T16:41:18+5:30
वडिलांना अटक केली म्हणून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

औरंगाबाद - वडिलांना अटक केली म्हणून मुलाची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 09 - वडिलांना अटक केली म्हणून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
अमोल नाडे असं या मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र नाडे यांच्यावर 25 वर्षापुर्वी हाणामारीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. यावेळी अमोल नाडे माझ्या वडिलांना अटक करु नका अशी वारंवार विनवणी करत होता. मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता हरिश्चंद्र नाडे यांना अटक केली. वडिलांना अटक झाल्याचा अमोल नाडे याला प्रचंड धक्का बसला आणि त्याने विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. वाळूज पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.