ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी
By Admin | Updated: November 26, 2014 02:21 IST2014-11-26T02:21:53+5:302014-11-26T02:21:53+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालात औरंगाबाद विभागाने बाजी मारली.
दहावीचा निकाल 29.25 टक्के तर बारावीचा 26.77 टक्के लागला. मार्च परीक्षेप्रमाणोच ऑक्टोबर परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही वाढली आहे. शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला राज्यात 1 लाख 35 हजार 916 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 39 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीला 93 हजार 510 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 25 हजार 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेला 25 हजार 142 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6,508 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळाचा निकाल 25.88 टक्के लागला.
बारावी परीक्षेत 26 हजार
524 विद्याथ्र्यापैकी 7,413 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 27.95 आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा:या दहावी-बारावी परीक्षेत कोकण मंडळ निकालाच्या टक्केवारीत आघाडीवर असते. परंतु ऑक्टोबर परीक्षेत या मंडळाचा निकाल
सर्वात कमी लागला. कोकण मंडळाचा दहावीचा निकाल
22.48 तर बारावीचा 22.34 टक्के लागला. (प्रतिनिधी)
दहावी व बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागाने बाजी मारली. या विभागाचा दहावीचा निकाल सर्वाधिक म्हणजे 33.15 टक्के लागला. बारावीतही निकालाच्या टक्केवारीत औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर आहे.
राज्यात मार्चप्रमाणोच ऑक्टोबरच्या निकालाचा टक्काही वाढला. दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 11.4क् टक्क्यांनी वाढून 29.25 इतका झाला तर बारावीचा निकाल
5.क्2 टक्क्यांनी वाढून 26.77 टक्के लागला.