शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणावर राज्यात बंदी का?; औरंगाबाद खंडपीठाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 05:38 IST

‘लोकमत’च्या बातमीवरून दाखल करून घेतली ‘स्यू मोटो याचिका’

औरंगाबाद : राज्य शासन स्टॉल्सवर आणि दुकानावरून वृत्तपत्र खरेदीला परवानगी देत आहे तर घरोघरी वितरणावर बंदी का घातली आहे. हे कळत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवर सोमवारी स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली. यावर प्रधान सचिवांना २४ एप्रिलपर्यंत त्याचे उत्तर दाखल करायचे आहे.कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनमधून मुद्रित माध्यमांना केंद्र सरकारने सूट दिली आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने छापलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सोमवारी तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीच्या वेळी स्वत:हून दखल घेतली. ‘लोकमत’च्या वरील वृत्ताला स्यू-मोटो याचिका म्हणून खंडपीठाने दाखल करून घेतले. न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून अ‍ॅड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाने नेमणूक केली आहे. अ‍ॅड. बोरा यांना २२ एप्रिलपर्यंत जनहित याचिका खंडपीठात सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे खंडपीठाने राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. प्रधान सचिवांना २४ एप्रिलपर्यंत त्याचे उत्तर दाखल करावयाचे आहे. शासनाच्या वतीने खंडपीठातील मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी नोटीस स्वीकारली. काळे यांना २७ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करता येईल, असे आदेशात म्हटले आहे.खंडपीठाचे निरीक्षणराज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी शनिवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, वृत्तपत्र छापायला परवानगी आहे. मात्र वितरणावर बंदी आहे. याचीही खंडपीठाने दखल घेतली आहे. आदेशात म्हटल्यानुसार सध्या जग कोरोनाच्या समस्येला सामोरे जात आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध पावले उचलत आहे. याची न्यायालयाला कल्पना आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टcorona virusकोरोना वायरस बातम्या