शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

By admin | Updated: August 12, 2016 20:04 IST

शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव अमान्य केले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव अमान्य केले. याउलट २०१६-१७ मध्ये अर्ज केलेल्या व पात्र ठरलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता दिली. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी १८ आॅगस्ट रोजी होणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी अमान्य केलेले जून २०१४ पासूनचे बहुतांश प्रस्ताव हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित लोकांचे आहेत. हा पूर्वग्रह मनात ठेवून २०१५-१६ साठीचे सर्व प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांनी फेटाळले. याउलट भाजप सरकारच्या काळातील सर्व प्रस्ताव मंजूर केले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. औरंगाबादेतील विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश देसले यांनी अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी शिक्षणमंत्री (पदानिशी), शिक्षणमंत्री विनोद तावडे (नावानिशी), शिक्षण सचिव आणि प्रस्ताव छाननी समिती, औरंगाबाद यांना प्रतिवादी केले आहे. याचिकेची पार्श्वभूमीयाचिकाकर्ते औरंगाबादेत संस्कार विद्यालय नावाची सातवीपर्यंतची शाळा चालवितात. या शाळेत आठवी आणि नववीचे वर्ग सुरू करण्यासाठी (दर्जावाढीसाठी) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याची छाननी समितीने छाननी करून शिक्षण आयुक्तांमार्फत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. शासनाने काही प्रस्तावांना मान्यता दिली, तर काही प्रस्तावात त्रुटी असल्याच्या कारणाने प्रलंबित ठेवले. प्रस्ताव प्रलंबित असलेल्या संस्थांनी २०१६-१७ सालासाठी नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे नोव्हेंबर २०१५ मध्ये एका परिपत्रकाद्वारे कळविले. त्यांना ह्यआॅनलाईनह्ण दुरुस्तीची परवानगी दिली. शिक्षणमंत्र्यांचा आदेशत्यानुसार राज्यातील जवळपास सर्वच संस्थांनी त्रुटी दूर केल्या. याचिकाकर्त्यासह राज्यातील वरील सर्वच संस्थांच्या प्रस्तावांवर मंत्रालयस्तरावर छाननी होऊन, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या मान्यतेसह सदर प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आले. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी ह्य२०१५-१६ चे प्रलंबित शैक्षणिक प्रस्ताव असलेल्या संस्थांना (शाळांना) अपात्र असल्याचे कळविण्यात यावे. सन २०१६-१७ मध्ये अर्ज केलेल्या व पात्र असलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता द्यावीह्ण असा आदेश ३० मे २०१६ रोजी दिला.प्रस्ताव मान्य, अमान्येबाबत कायदेशीर तरतूदमहाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ या कायद्याच्या कलम ८(१) नुसार कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा प्रस्ताव मान्य अथवा अमान्य करण्याचा निर्णय योग्य त्या कारणमीमांसेसह संबंधित संस्थेला कळविणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. याचा संदर्भ देऊन शिक्षणमंत्र्यांनी वरील तरतुदींचे पालन केले नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी राज्यघटनेच्या कलम १६३ नुसार ह्यनि:पक्ष व भेदभावविरहितह्ण काम करण्याची शपथ घेऊन अधिकार ग्रहण केला आहे. असे असताना प्रस्तुत प्रकरणात त्यांनी भेदाभेद केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. खंडपीठाने न्यायालयाच्या नोटिसीशिवाय याचिकाकर्त्याला स्वतंत्रपणे प्रतिवादींना नोटिसा बजावण्याची मुभा दिली आहे. आॅनलाईन पद्धतीने प्राप्त प्रस्तावशिक्षण संचालकांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ५ आॅक्टोबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान राज्यभरातून ह्यआॅनलाईनह्ण पद्धतीने एकूण ५३०१ प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी ३७३३ प्रस्ताव पात्र ठरतात, तर १५५१ प्रस्ताव अपात्र ठरतात. तर १७ प्रस्ताव शासन निर्णयार्थ सादर केले होते. या प्रस्तावांवर शिक्षणमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्त्यास माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत देण्यात आली होती.