शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद बँक अधिकारी हत्या, पत्नीनेच दिली होती सुपारी, पत्नीसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 15:10 IST

औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये बँक अधिकारी  जितेंद्र होळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद, दि. 10 -  पती सतत चारित्र्यावर संशय घेत मारहाण आणि शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून पत्नीनेचं  २ लाख रूपयाची सुपारी देऊन जितेंद्र होळकर या बँक अधिका-याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील छत्रपतीनगरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. शुक्रवारी मध्यरात्री दोन च्या सुमारास ही घटना घडली.गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन मारेकऱ्यांना अटक केली . पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी कारवाई करीत सुपारी देणारी मृताची पत्नी भाग्यश्री, मध्यस्थ असलेला शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे आणि प्रत्यक्ष खून करणाऱ्या शेख तौसीफ आणि शेख बाबु यांना शनिवारी रात्री अटक केली.दोन ते तीन महिन्यापासून भाग्यश्री ही पतीच्या त्रासापासून सुटका करावी याकरिता तिच्या ओळखीचा किरण गणोरे याच्याकडे आग्रह करीत होती. तेव्हापासून हा खून करण्यासाठी ते प्लॅनिंग सुरू होते. होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिने त्याचा काटा काढण्याचा  डाव रचला. यानंतर गणोरे याने त्यांच्या ओळखिचा तौसीफला ही बाब सांगितली.तो हे काम करण्यास तयार झाला. मात्र, त्याने ही बाब भाग्यश्रीच्या तोंडून एकायचे असल्याचे तो म्हणाला .त्यानंतर काही दिवसाने गणोरेने जिल्हा परिषद कार्यालयबाहेर भाग्यश्रीची भेट करून दिली तेथे भाग्यश्रीने आरोपीला जितेंद्रपासून सुटका करा तुम्हाला आम्ही भरपुर पैसे देऊ असे सांगितले. हे काम करण्यासाठी १० हजार रुपये अडव्हान्सही त्याला दिले. खुनानंतर उर्वरित १ लाख ९० हजार देण्याचे ठरले होते.घट्नेच्या दिवशी आरोपीला मदत करण्यासाठी भाग्यश्रीने दाराची कडी उघडून ठेवली होती हे तपासात समोर आले. पोलिसांनी कांबी येथून खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक केले. याप्रकरणानंतर अनेकांना धक्का बसला आहे. गुन्हे शाखेचे निरिक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे , लालखा पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात आणि  कर्मचाऱ्यानी ही कामगिरी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून