शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद: शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 18:20 IST

शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या चौघांपैकी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे यास ४ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर पोलिसांनी आज दुसरा आरोपी जगदीश ठोंबरे याच्या मुसक्या आवळल्या. 

औरंगाबाद: शीतपेयातून विवाहितेला मद्य पाजून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या चौघांपैकी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे यास ४ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर पोलिसांनी आज दुसरा आरोपी जगदीश ठोंबरे याच्या मुसक्या आवळल्या. याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी सांगितले. २ नोव्हेंबर रोजी रात्री पीडितेला शितपेयातून मद्य पाजून चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपींनी तिला चिकलठाणा विमातनळासमोर आणून फे कून दिले होते. याप्रकरणी शनिवारी पहाटे आरोपींविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अनिल ठोंबरे याला बेड्या ठोकल्या. अन्य नराधमांना पीडिता ओळखत नव्हती. यामुळे अनिल यास पकडल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी अन्य आरोपींची नावे मिळविली आणि त्यांचा शोध सुरू केला. पकडल्या जाण्याच्या भितीपोटी आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद केले. यामुळे त्यांना पकडणे पोलिसांना आव्हान होते. पोलिसांनी खबºयांना कामाला लावले आणि आरोपीच्या घरीही त्यांचा शोध घेतला, मात्र ते घरी सापडले नाही. आरोपीला मदत करणाºयांवरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच त्यांनी संबंधितांना दिला. दरम्यान रविवारी सकाळी दुसरा आरोपी आडगाव शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांच्या एका पथकाने त्याचा कसून शोध घेतला असता दुपारी १२ वाजेच्या सुमारास जगदीश ठोंबरे हा पोलिसांच्या हाती लागला. अन्य दोन आरोपीही लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असे  सपोनि ताईतवाले यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारArrestअटक