शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील खड्डेमुक्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाइनच; दर सोमवारी अहवाल सादर करा, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 05:33 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कोणतीही सबब न सांगता 

मुंबई : तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, तसेच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.राज्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आल्याने बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून होणार आहे.मुंबईसह राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात दिले होते; परंतु अद्याप पूल आणि रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. रस्त्यांवर खड्डे पडल्याने सरकार विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.  

२०० किलोमीटरची पाहणी; अहवाल सादर करामुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात दोन दिवस, तर कार्यकारी अभियंता यांनी आठवड्याच्या तीन दिवस रस्ते आणि पुलांची किमान दोनशे किलोमीटरपर्यंत पाहणी करावी. खड्डेमुक्त रस्ते आणि पूल कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंत्यावर असणार आहे. राज्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते व राष्ट्रीय महामार्गांना या सूचना लागू राहतील, असेही या अध्यादेशात नमूद केले आहे.

आदेशात काय?३१ ऑगस्टपर्यंत खड्डे पूर्णत: बुजवले गेले पाहिजेत. खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. गणेशोत्सवापूर्वी राज्यभरातील सर्व क्षेत्रीय अभियंता आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची अद्ययावत माहिती संकलित स्वरूपात जमा करावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या पुलांचा आढावा घेऊन खड्डे व दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावे.सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सव काळात रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील, याची काळजी घेऊन त्याचे नियोजन करावे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे