शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:24 IST

पन्नासहून अधिक नाटकांत आणि साठपेक्षा जास्त चित्रपटांत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटविणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे बुधवारी, ६ नोव्हेंबरला ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

ठळक मुद्देमाजी नाट्य संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे बुधवारी, ६ नोव्हेंबरला ९१व्या वर्षात पदार्पण

मराठी रंगभूमी दिनानिमित्त श्रीकांत मोघे यांच्याशी 'अतुल चिंचली ' यांनी साधलेला हा संवाद...

मराठी नाटकांच्या भविष्याबद्दल तुमचे मत काय? मराठी नाटकांना उज्ज्वल भविष्य आहे. भारतापेक्षा अमेरिका, युरोप, दुबई या ठिकणी मराठी नाटके जोरात चाललात. महाराष्ट्रापेक्षा परदेशात मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, ही अभिमानस्पद गोष्ट आहे. गेल्या दहा वर्षांत नाटकाला वेगळेपण आले आहे. नाटक प्रेक्षकांसमोर येण्याअगोदर यांत्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. त्यासाठी सर्व माध्यमांचा वापर होतो. भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढत जाणार आहे.  

पुण्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल? मराठी समाज व्यवसायाभिमुख नाही. मुंबई आणि पुण्यात बारा ते पंधरा मराठी नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांत टॉयलेटची अवस्था बिकट असते, पाणी नसते, पार्किंग सुविधा अपुऱ्या असतात अशा अनेक समस्या असतात. त्यासाठी आपण कुठल्याही नाट्यगृहांना दोष देऊन चालणार नाही. नाटक व्यवसायातून नाट्यगृहांना मिळणारा पैसा योग्य ठिकाणी वापरला, तर नाट्यगृहे दुरवस्थेत राहणार नाहीत.  

नाटक आणि चित्रपट यांतील वेगळेपण काय आहे?प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी पहिल्या रांगेपासून ते नाट्यगृहाच्या क्षमतेनुसार शेवटच्या रांगेपर्यंत बसतात. कलाकाराला नाटक सादर करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण पहिली रांग रंगमंचापासून दहा फुटांवर असते; पण शेवटची रांग पन्नास ते साठ फुटांवर असते. पुढच्या व्यक्तीला कलाकारांच्या चेहºयावरील हावभाव दिसतात; पण मागच्या व्यक्तीला दिसत नाहीत. चित्रपटात मात्र असे होत नाही. स्क्रीनवर कलाकाराला कष्ट घ्यावे लागतात; पण नाटकाप्रमाणे मेहनत घ्यावी लागत नाही. चित्रपटात कॅमेरा चेहऱ्यावरील हावभाव आणि अभिनय दाखवतो. 

मराठी चित्रपटाची हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांशी तुलना केली असता आपला प्रेक्षकवर्ग कमी का दिसतो?देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. हिंदी चित्रपट भारत देशासहित पूर्ण जगात प्रदर्शित होतात. त्यामुळे हिंदीशी आपली तुलना होऊ शकत नाही. मराठी माणसाला दोन्ही भाषा कळतात. मराठीचा प्रेक्षकवर्ग मराठी आणि हिंदी चित्रपट अशा दोन्ही ठिकाणी विभागला गेला आहे. त्यामुळे मराठीला प्रेक्षकवर्ग कमी दिसून येतो. दाक्षिणात्य चित्रपटांच्या लोकांना हिंदी भाषा जास्त कळतच नाही. त्यांना आपल्या भाषेचा अभिमान असून ते फक्त साऊथ चित्रपटाला प्राधान्य देतात.  

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाTheatreनाटक