सिंधूच्या विजयी रॅलीत नीलांबरी

By Admin | Updated: August 21, 2016 21:34 IST2016-08-21T21:34:58+5:302016-08-21T21:34:58+5:30

प्रशिक्षक गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी बेस्टची आन, बान, शान असलेली नीलांबरी हैद्राबादला रवाना झाली

Auction in Sindhu's Vijay Rally | सिंधूच्या विजयी रॅलीत नीलांबरी

सिंधूच्या विजयी रॅलीत नीलांबरी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रिओमध्ये बॅडमिंंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी बेस्टची आन, बान, शान असलेली नीलांबरी हैद्राबादला रवाना झाली आहे. सोमवारी सकाळी नीलांबरीतून सिंधूची विजयी रॅली काढण्यात येणार आहे.
२२ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पी. व्ही. सिंधू आणि गोपीचंद यांचे हैद्राबाद विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर दोघांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी ही ओपन डबलडेकर बस पुरवण्यात यावी, अशी विनंती तेलंगणा सरकारने बेस्ट प्रशासनाकडे केली होती.
त्यानुसार, बेस्ट प्रशासनाने सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीसाठी नीलांबरी बस पाठवण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून रविवारी सकाळी ९ वाजता नीलांबरी हैद्राबादला रवाना देखील झाली आहे. नीलांबरीसोबत बसचा मेंटेनन्स स्टाफ पाठवण्यात आला आहे.
तेलंगणाकडून विनंती केल्यानंतर आमच्याकडे खूपच कमी वेळ होता. तरीही हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. बेस्टला सिंधू आणि गोपीचंद यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Auction in Sindhu's Vijay Rally