एटीव्हीएम कार्डने भरा मुतारीचे शुल्क
By Admin | Updated: September 26, 2014 03:24 IST2014-09-26T03:24:44+5:302014-09-26T03:24:44+5:30
सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने अनेक ठिकाणी त्यावरून वादविवाद होत असताना दिसतात

एटीव्हीएम कार्डने भरा मुतारीचे शुल्क
मुंबई : सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने अनेक ठिकाणी त्यावरून वादविवाद होत असताना दिसतात. हे पाहता हा वाद रेल्वे स्थानकांवरील मुतारीचे शुल्क भरताना होऊ नये यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुता-यांसाठी एटीव्हीएम कार्डद्वारे शुल्क भरण्याच्या पर्यायाचा
विचार मध्य रेल्वेकडून केला जात
आहे.
सध्या रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या मुताऱ्यांचा वापर करताना महिला प्रवाशांकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. तर यापुढे काही स्थानकांवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुताऱ्यांचा वापर करणाऱ्या पुरुष प्रवाशांकडूनही शुल्क आकारण्याचा विचार मध्य रेल्वेकडून होत आहे. मध्य रेल्वेच्या २0 स्थानकांवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुताऱ्यांसाठी स्वारस्य प्रस्ताव मागवण्यात येत आहे. या मुताऱ्यांच्या वापर प्रवाशांकडून करतानाच सुटा एक रुपया देण्यावरून कुठलाही वाद होऊ नये यासाठी मध्य रेल्वे एक नवीन पर्यायाच्या विचारात आहे. या मुताऱ्यांचे शुल्क प्रवाशांकडून अदा करताना ते एटीव्हीएमद्वारे अदा करता येऊ शकतात का याचा विचार केला जात आहे.
यामुळे प्रवाशांची सुट्या पैशांच्या कटकटीतून सुटकेसाठी हा पर्याय शोधत आहोत, असे मध्य रेल्वे- महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)