शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CoronaVirus News: मोठी बातमी! नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:38 IST

CoronaVirus News: व्यवसायिक प्यारे खान यांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला; टँकर्स पुन्हा नागपूरला रवाना

नागपूर: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दररोज जवळपास ६० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रेमडेसिविर आणि ऑक्सिजनसाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र एका व्यवसायिकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला.सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणारनागपूरला ऑक्सिजनची नितांत गरज असल्यानं अशमी ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी ४ टँकर्सची व्यवस्था केली. खान यांनी सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकरची सोय केली. हे टँकर छत्तीसगडच्या भिलाईहून निघाले होते. मात्र त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्यानं खान यांनी ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तांत्रिक बिघाड झाल्यानं विलंब होत असल्याचं सांगितलं. कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?ऑक्सिजन टँकर्स येण्यास बराच उशीर होत असल्यानं खान यांनी तातडीनं त्यांची एक टीम टँकर अडकून पडलेल्या ठिकाणी पाठवली. त्यावेळी एक धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. चारही टँकर्स गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेनं निघाले होते. यासंदर्भात प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र त्यांनी आधी टाळाटाळ केली आणि नंतर उत्तरं देणंच बंद केलं. त्यामुळे खान यांनी सूत्रं हलवली आणि चारही टँकर्स रोखण्याचा निर्णय घेतला.गुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळत असल्यानं त्यांनी चारही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं खान यांना समजलं. या चारपैकी दोन टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेनं निघाले होते. मात्र खान यांनी चारही टँकर्स वळवायला लावले. यापैकी दोन टँकर्स नागपुरला पोहोचले असून उर्वरित २ टँकर्स थोड्याच वेळात नागपुरला पोहोचतील.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या