महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: May 16, 2015 03:44 IST2015-05-16T03:44:37+5:302015-05-16T03:44:37+5:30

येथील बाजारतळावरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकातील महिला पोलिसाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला

Attempts to burn women police | महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

जामखेड (जि. अहमदनगर) : येथील बाजारतळावरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकातील महिला पोलिसाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला. अतिक्रमणधारकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यालासुद्धा धक्काबुक्की केली.
पोलिसांनी अतिक्रमणधारकांसह आठ जणांवर गुन्हे दाखल केले असून, चौघांना ताब्यात घेतले आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मोहन पवारने बाजारतळावरील जागा तारकम्पाउंड करून अतिक्रमित केली होती. गुरुवारी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. तेव्हा अतिक्रमण काढण्यास अडथळा आणू नका, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर लहू सीताराम पवारने हॉटेलमधून रॉकेलची बाटली आणून महिला पोलीस शबनम दिलावर शेख यांच्या अंगावर रॉकेल टाकले.

Web Title: Attempts to burn women police