शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!

By विकास राऊत | Updated: June 17, 2025 14:00 IST

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूरदरम्यान असलेल्या बोगद्यांमध्ये हा प्रकार होत असल्याचे त्यातून दिसते. वाहन थांबवून लुटीसाठी दगडफेक करण्याची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रात्री पोलिस गस्त व इमर्जन्सी सेवा वाढविण्याची गरज प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. 

व्हिडीओ नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, हे समजत नाही; परंतु रविवारी व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो सोमवारी व्हायरल झाला. रात्रीच्या सुमारास एका खासगी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे घेतल्याने अनर्थ टळला. 

कुठे होत आहेत घटना?हर्सूल-सावंगी, लासूर स्टेशन, माळीवाडा, वैजापूर येथे इंटरचेंज व बोगद्याच्या मधोमध लुटमारीच्या घटना होत आहेत. 

दोन वर्षांतील घटना - छत्रपती संभाजीनगरलगत एका कुटुंबाचे वाहन अडवून सोने व इतर साहित्य लुटून मारहाण - वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनावर दगडफेक; त्यात एक जण जखमी - करजना गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर दगडफेक - मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून रोख रक्कम व इतर साहित्य लुटले.    - मेहकरजवळ मुंबईकडे जात असलेल्या कुटुंबास लुटले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी