वृद्धेला लुटणारा सोनसाखळीचोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 02:47 IST2017-05-11T02:47:26+5:302017-05-11T02:47:26+5:30

शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या वृध्देला लुटून पसार झालेल्या सोनसाखळी चोराला बेड्या ठोकण्यास गावदेवी पोलिसांना यश आले आहे.

Attempted to rob the old man | वृद्धेला लुटणारा सोनसाखळीचोर अटकेत

वृद्धेला लुटणारा सोनसाखळीचोर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या वृध्देला लुटून पसार झालेल्या सोनसाखळी चोराला बेड्या ठोकण्यास गावदेवी पोलिसांना यश आले आहे. नागेश पवार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या लक्की शर्टामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
बाबुलनाथ रोड येथील इमारतीत वर्षा खंबाती (६२) या कुटुंबियासोबत राहतात. १ मे च्या रात्री साडे आठच्या सुमारास त्या जेवणानंतर शतपावली करुन घरी परतत होत्या. त्याच दरम्यान पवारने त्यांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला. सीसीटीव्हीत त्याचा चेहरा कैद झाला नाही. मात्र त्यांच्या निळ्या रंगाच्या शर्टावरुन पोलिसांनी शोध सुरु केला. अखेर अन्य एका ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटनात निळ्या रंगाच्या शर्टमध्ये एक आरोपीचे फुटेज पोलिसांना मिळाले. त्यामध्ये तो सोनसाखळी चोर पवार असल्याचे समोर आले.

Web Title: Attempted to rob the old man