शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

By अतुल कुलकर्णी | Updated: May 14, 2020 07:13 IST

एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत

- अतुल कुलकर्णीमुंबई : भाजपमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत. माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित अशा बहुजन समाज व ओबीसी नेत्यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आपल्याला राज्यसभेच्या वेळी उमेदवारी देता येणार नाही, पण विधानपरिषदेच्यावेळी नक्की विचार करु असे सांगण्यात आले. मात्र ज्यांनी कायम भाजपला शिव्या दिल्या, आमच्या नेत्यांविषयी वाईट उद्गार काढले त्यांना उमेदवारी दिली गेली आणि जे पक्षात निष्ठावंत होते त्यांना डावलले गेल, असा दावाही खडसे यांनी केला.भाजपमधील घराणेशाहीबद्दल खडसे म्हणाले, आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पण माझ्या घरात फक्त सुनेला उमेदवारी दिली गेली. माझी पत्नी सहकार क्षेत्रातील महानंदवर आहे. जेथे भाजपचे फक्त दोन सदस्य आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते, त्यांच्या काकू शोभाताई आमदार होत्या, मंत्री होत्या, ते स्वत: मुख्यमंत्री होते, आता विरोधी पक्ष नेते आहेत, रावसाहेब दानवे आणि त्यांचे चिरंजीव, राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव देखील सत्तेत आहेत.खडसेंचा राग नेमका कोणावर? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की देवेंद्र फडणवीस यांच्यावर? पक्षात किती नाराजी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खडसे यांनी दिली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसे