लाचखोर महापौरांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
By Admin | Updated: February 2, 2015 04:17 IST2015-02-02T04:17:15+5:302015-02-02T04:17:15+5:30
लाच घेतल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी महापौर तृप्ती अवधूत माळवी प्रयत्नशील आहेत. अटकेच्या भीतीने माळवी शनिवारी रुग्णालयात दाखल झाल्या

लाचखोर महापौरांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
कोल्हापूर : लाच घेतल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी महापौर तृप्ती अवधूत माळवी प्रयत्नशील आहेत. अटकेच्या भीतीने माळवी शनिवारी रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांना अटक करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.
सोमवारी रुग्णालयातून माळवी यांनी घरी सोडण्यात येईल, त्याच क्षणी त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक उदय आफळे यांनी दिली. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे माळवी समर्थकांकडून अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माळवी यांचा स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी याने भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी १६ हजारांची लाच घेतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी त्याला रंगेहाथ पकडले होते.
महापौर माळवी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात येणार आहे. लाच घेण्यापूर्वी तक्रारदार, गडकरी व माळवी यांच्यात संभाषण झाले होते. त्याचे व्हॉईस रेकॉर्डिंग पोलिसांनी केली आहे. (प्रतिनिधी)