पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात

By Admin | Updated: September 8, 2016 16:49 IST2016-09-08T16:44:14+5:302016-09-08T16:49:32+5:30

वरळी नाका परिसरात नाकाबंदीदरम्यान एका दुचाकीस्वाराला अडविल्यानं त्यानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घातली.

The attacks on the police stopped | पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात

पोलिसांवरील हल्ले थांबता थांबेनात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - पोलिसांवरील वाढते हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत ठोस भूमिका घेत नागरिकांना पोलिसांशी सौजन्याने वागावे, अन्यथा कडक भूमिका घेऊ, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांचा इशारा देत 24 तास उलटत नाहीत तोच वरळी नाका परिसरात नाकाबंदीदरम्यान एका दुचाकीस्वाराला अडविल्यानं त्यानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. या हल्ल्यात पोलीस नाइक निकाळजे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी विनाहेल्मेट चालवणा-यावर कारवाईची भूमिका घेतली आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर काही दिवसानंतरच एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर तरुणाने बाईक घातल्याची घटना समोर आली होती. एका महिला कॉन्स्टेबलला महिलेनेच केलेली मारहाण आणि लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांने पोलिसाला केलेली अडवणूक या अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. 

Web Title: The attacks on the police stopped