भांडुपमध्ये वर्चस्वाच्या वादातून हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: June 11, 2016 04:03 IST2016-06-11T04:03:20+5:302016-06-11T04:03:20+5:30
भांडुपमध्ये वर्चस्वाच्या वादातून दोन गटांमध्ये शुक्रवारी हल्ला चढविण्यात आला.

भांडुपमध्ये वर्चस्वाच्या वादातून हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा
मुंबई : भांडुपमध्ये वर्चस्वाच्या वादातून दोन गटांमध्ये शुक्रवारी हल्ला चढविण्यात आला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.
भांडुप टेंभीपाडा परीसरात राहत असलेल्या विकी चव्हाण उर्फ बारक्या (२०) याला तेथील सुरज नेपाळीने धमकावले. हाच राग मनात धरत बारक्यानेही त्याच्यावर हल्ला चढविला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास बारक्या टेंभीपाडा पोलीस चौकी येथून एकटा जात असल्याचे नेपाळीच्या लक्षात आले. हीच संधी साधून आपल्या २० ते २५ साथीदारांना घेऊन नेपाळीने त्याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. (प्रतिनिधी)