ठाणे महानगरपालिका उपायुक्तांवर हल्ला

By Admin | Updated: May 11, 2017 02:28 IST2017-05-11T02:28:56+5:302017-05-11T02:28:56+5:30

नौपाड्यातील गावदेवी रस्त्यावरील फेरीवाले तसेच आपल्या दुकानाबाहेर पथारी मांडून पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेले

Attack on Thane Municipal Corporation Deputy Commissioner | ठाणे महानगरपालिका उपायुक्तांवर हल्ला

ठाणे महानगरपालिका उपायुक्तांवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नौपाड्यातील गावदेवी रस्त्यावरील फेरीवाले तसेच आपल्या दुकानाबाहेर पथारी मांडून पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेले पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावरच पोळीभाजी केंद्रचालक प्रवेश देशपांडे यांनी हल्ला केला.
यात ते जखमी झाले असून त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. माळवी हे अतिक्रमणविरोधी पथकासह बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नौपाड्यातील गावदेवी भागात कारवाईसाठी गेले होते. त्यांनी काही फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर एकवीरा पोळीभाजी केंद्राबाहेर अस्ताव्यस्तपणे पडलेले सामानही ताब्यात घेतले. यातूनच पोळीभाजी केंद्रचालक देशपांडे आणि माळवी यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली.
या झटापटीत त्यांचा शर्टही फाडला. कारवाई सुरू असताना फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षाचालक यांची एकच पळापळ झाली. त्यात अन्य एक जण जखमी झाला. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Attack on Thane Municipal Corporation Deputy Commissioner