सोलापुरात आरटीआय कार्यकर्ते शरद कोळींवर हल्ला

By Admin | Published: February 8, 2017 10:54 PM2017-02-08T22:54:20+5:302017-02-08T23:12:02+5:30

सोलापूरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अनेक वर्षांपासून लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

The attack on RTI activist Sharad Koli in Solapur | सोलापुरात आरटीआय कार्यकर्ते शरद कोळींवर हल्ला

सोलापुरात आरटीआय कार्यकर्ते शरद कोळींवर हल्ला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 08 -  सोलापूरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अनेक वर्षांपासून लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात शरद कोळी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचर सुरु आहेत.
 
गेल्या अनेक वर्षांपासून शरद कोळी यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सातत्याने आवाज उठविला आहे. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना माढा तालुक्यातील बोराळे येथे झालू असून हा हल्ला वाळू माफियांनी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीसांचेही अपहरण झाल्याचे समजते. 
 
यापूर्वीही त्यांच्यावर  बेगमपुर येथे प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या सरंक्षणासाठी दोन पोलीस दिले आहेत. 

 

Web Title: The attack on RTI activist Sharad Koli in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.