शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

निवडणुकीवर ‘एआय’चे सावट; पक्षांना फायदा अन् भीतीही; आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सतर्क

By यदू जोशी | Published: March 06, 2024 12:51 PM

भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे.

यदु जोशी -

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) सारे जग ढवळून निघाले असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्या माध्यमातून आभासी वास्तव आणि आभासी अवास्तव प्रतिमांचा वापर प्रचार व अपप्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख राजकीय पक्षांच्या आयटी सेलच्या यंत्रणा त्याच्या वापर आणि मुकाबल्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे.

...आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलले करुणानिधी तमिळनाडूमध्ये गेल्या महिन्यात एक पुस्तक प्रकाशन समारंभ झाला. ज्येष्ठ नेते ८२ वर्षीय टी आर बालू यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यावेळी स्क्रीनवर दिवंगत नेते के. करुणानिधी आठ मिनिटे बोलले. त्यांनी बालू यांचे कौतुक केले आणि सोबतच आपले पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या कारभाराचीही प्रशंसा केली. आवाज देखील करुणानिधी यांचा होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे शक्य केले. तसाच वापर लोकसभानिवडणूक प्रचारात वेगवेगळे पक्ष करू शकतात.

प्रतिमाभंजनासाठी गैरवापर होण्याची शक्यता nखऱ्या आणि एआयने बनविलेल्या प्रतिमांमधील फरक ज्यांना कळत नाही अशा लोकांवर जाहिराती आणि संदेशांचा भडिमार करण्याची योजना राजकीय पक्षांनी आखली आहे. nएआय निर्मित दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंचा प्रभाव रोखणे, खोटेपणा उघड करणे असे मोठे आव्हान पक्षांसमोर असेल. आगामी निवडणुकीत एआयचा चांगला वापर होण्यापेक्षा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे.

डेटा गोळा करण्याचे काम सुरू फेसबुकवर असलेली एक व्यक्ती राजकीय, सामाजिक स्वरूपाच्या किती पोस्ट टाकते, त्या पोस्टना त्याचे फेसबुक फ्रेंड वा अन्य लोक कसा प्रतिसाद देतात याची माहिती घेऊन ते फ्रेंड आणि त्यांचेही फ्रेंड अशांचा डेटा गोळा करण्याचे काम राजकीय पक्ष आणि विशेषत: भाजप सध्या करीत आहे. त्यातून भाजपच्या विचारसरणीचे कोण, विरोधातील कोण आणि दोन्हींसोबत नाहीत असे किती जण आहेत याची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठीही एआयचा वापर केला जात आहे. एआय क्षेत्रातील कंपन्यांची सेवा घेतली जात आहे.

एआयचा माहिती जमा करणे, विश्लेषण करणे, लोकांपर्यंत पोहोचणे यासाठी फायदा आहे. मात्र, एआयचा गैरवापर करून बदनामी केली जाऊ शकते. दोन्ही पातळींवर आव्हाने आहेत, त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.- श्वेता शालिनी, प्रदेश भाजप, सोशल मीडिया प्रभारी

एआयचा आगामी निवडणुकीत गैरवापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.  सर्व यंत्रणा हाताशी धरून काँग्रेसवर सोशल मीडियातून हल्ले नक्कीच केले जातील. त्यांचा मुकाबला करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.- विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस, सोशल मीडिया प्रभारी 

टॅग्स :lok sabhaलोकसभाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सElectionनिवडणूक