मनसेच्या महिला शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: October 25, 2016 21:17 IST2016-10-25T21:17:01+5:302016-10-25T21:17:01+5:30
ठाण्यात मनसेच्या एका महिला शहराध्यक्ष समीक्षा मार्कंडेय यांच्यावर दोघा अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे.

मनसेच्या महिला शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 25 - ठाण्यात मनसेच्या एका महिला शहराध्यक्ष समीक्षा मार्कंडेय यांच्यावर दोघा अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात समीक्षा मार्कंडेय गंभीर जखमी झाल्या आहेत. मनसे शहराध्यक्ष असलेल्या महिलेच्या डोक्यात रॉड घालून तिला मारहाण करण्यात आलं आहे.
गंभीर जखमी असलेल्या समीक्षा मार्कंडेय यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. समीक्षा यांचे पती समीर मार्कंडेय हे मिड डे या वर्तमानपत्रात फोटोग्राफर आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.