गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

By Admin | Updated: June 27, 2014 13:26 IST2014-06-27T13:04:11+5:302014-06-27T13:26:35+5:30

जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.

In the attack of Gadchiroli Naxalites, the martyr martyr | गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

>ऑनलाइन टीम
गडचिरोली, दि. २७ - जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. उमेश पांडुरंग जावळे(३१) असे शहीद जवानाचे नाव असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील मेंढा येथील रहिवासी होता. दरम्यान जंगलामध्ये पोलिसांचे पथक दाखल झाले असून, माओवाद्यांचा कसून शोध सुरू आहे.
शुक्रवारी नक्षलवाद्यांनी ग्यारापत्तीच्या जंगलामध्ये हल्ला केला. त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना उमेश जावळे शहीद झाले. उमेश जावळे हा पांडुरंग उर्फ़ बंडू जावळे यांचा मुलगा असून त्याच्या मागे आई-वजील व बहीण आहेत. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला उमेश हा अत्यंत धाड़सी म्हणून ओळखला जायचा. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्व गावावर शोककळा पसरली असून सायंकाळी चारच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: In the attack of Gadchiroli Naxalites, the martyr martyr