शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:48 IST

ATS news Maharashtra: मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली या गावात हा छापा टाकण्यात आला.

१९९७ मध्ये संपूर्ण भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखल्याबद्दल आणि २००२ आणि २००३ मध्ये मुंबईत दोन बॉम्बस्फोट घडवून आणल्याबद्दल शिक्षा भोगून सुटलेल्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार या गावातील नाचणचे काही लोक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचे समजले होते. यानंतर सुमारे ३५० हून अधिक पोलीस आणि १०० हून अधिक एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नाचणच्या गावावर छापा टाकला. 

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली या गावात हा छापा टाकण्यात आला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण, रायगड ग्रामीण येथील तब्बल ३५० हून अधिक पोलिस कर्मचारी अधिकारी, शीघ्र कृती दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाला वेढा दिला होता. मुंबई एटीएस पथकाचे सुमारे १०० अधिकारी कर्मचारी यांनी गावातील साकिब नाचण सह इतर अनेक घरात सर्च ऑपरेशन राबविले. 

मुंबई एटीएस पथकासह ठाणे, नाशिक येथील पथकाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. पहाटे ३ वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी १ वाजता पूर्ण झाली. या कारवाईमध्ये बोरिवली गावातील साकिब नाचणसह एकूण २२ घरांमध्ये सर्च ऑपरेशन करून तेथील संशयित व्यक्तींचे मोबाईल व लॅपटॉप तपासण्यात आले आहेत. या कारवाईवेळी अनेक मोबाईल व सिमकार्ड हे ताब्यात घेण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून एटीएस पथकाने कोणालाही अटक केलेली नाही.

साकिब नाचन हा सिमीचा सक्रिय सदस्य होता आणि २०१७ मध्ये सुटका झाल्यानंतर तो आयसिसमध्ये सामील झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये बोरिवली गावात साकिब नाचनच्या घरावर आणि इतर चौदा आरोपींच्या परिसरात एनआयएने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, धारदार शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीMaharashtraमहाराष्ट्र