शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दहशतवादी अबु जिंदालला शिक्षेपर्यंत पोहचविणाऱ्या एटीएसला १० लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 19:28 IST

दहशतवाद विरोधी पथकाने जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल याच्यासह २२ आरोपींना अटक केली होती़. एटीएसने केलेल्या तपासात सीमी व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी राजकीय व धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता़..

ठळक मुद्देराज्य सरकारकडून १२ वर्षांनी झाला ८६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव दहशतवाद विरोधी पथकाची २००६ या कालावधीमध्ये औरंगाबाद व मालेगाव परिसरात कारवाई या खटल्यात अबु जिंदाल सह १४ जणांना जन्मठेपेची शिक्षा १२ वर्षांनंतर या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव

पुणे : औरंगाबाद व मालेगाव परिसरात दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करुन २००६ मध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, दारुगोळा व स्फोटकांचा साठा जप्त केला होता़. यावेळी दहशतवादी अबु जिंदाल पळून गेला होता़. त्याला नंतर पकडण्यात आले़. या खटल्यात अबु जिंदाल सह १४ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती़. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकातील ८६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने १० लाख ८० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून तसा अध्यादेश नुकताच काढला आहे़. तब्बल १२ वर्षांनंतर या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात येणार आहे़. यामध्ये प्रत्यक्ष तपासात भाग घेतलेले व न्यायालयात साक्ष दिलेल्या २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ५ लाख ६५ हजार रुपये, गोपनीय माहितीद्वारे गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यासाठी मदत करणारे मात्र, न्यायालयात साक्ष न झालेले ३७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना २ लाख ९५ हजार रुपये आणि उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण चालविणारे कोर्ट लायझनिंग पथकातील २३ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना २ लाख २० हजार रुपये असे १० लाख ८० हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे़. दहशतवाद विरोधी पथकाने ९ मे ते १५ मे २००६ या कालावधीमध्ये औरंगाबाद व मालेगाव परिसरात कारवाई करुन १६ एके ४७ रायफल्स, ३ हजार २०० राऊंडस, ६२ मॅगझीन्स पाऊच, ४३ किलो आयडीएक्स स्फोटक पावडर, ५० हँडग्रेडेस असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता़. या गुन्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाने जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल याच्यासह २२ आरोपींना अटक केली होती़. एटीएसने केलेल्या तपासात सीमी व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी राजकीय व धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता़.. त्यांची हत्या करण्यासाठी लागणारी शस्त्रात्रे व स्फोटके मिळविली होती़. एटीएसने त्यापूर्वीच हा मोठा शस्त्रसाठा पकडल्याने देशातील मोठ्या नेत्यांची हत्या करण्याचा दहशतवाद्यांना कट उधळला गेला होता़. या कारवाईच्या दरम्यान अबु जिंदाल हा पळून गेला होता़. त्याला नंतर पकडण्यात आले होते़. गेल्या वर्षी अबु जिंदालसह १४ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती़. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाला गौरविण्यात यावे, असा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांनी १९ आॅगस्ट २०१६ रोजी पोलीस महासंचालकांना पाठविला होता़. महासंचालकांनी या प्रस्तावाची शिफारस ६ डिसेंबर २०१६ रोजी शासनाकडे केली होती़ त्यानंतर आता १० महिन्यांनंतर शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे़. या ८६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण आता निवृत्त झाले आहेत़. एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव यांची या खटल्यात साक्ष झाली होती़ त्यांना प्रशस्तीपत्र व  ३० हजार रुपये बक्षीस देण्यात आले आहे़. याबाबत निवृत्त सहायक पोलीस अधिकारी विनोद सातव यांनी सांगितले की, हा शस्त्रसाठा पकडल्यानंतर २००९ मध्ये एटीएसमध्ये आपली बदली झाल्यानंतर या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघांना आपण व आपल्या सहकाऱ्यांनी पकडले होते़. ज्या १४ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली़ त्यात आम्ही पकडलेल्या दोघांचा समावेश आहे़ शासनो इतक्या दिवसानंतर आमच्या कामाचा गौरव केला़ त्याचा आनंद आहे़.  गुन्हयाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने बक्षिसे मंजूर केले आहेत. प्रशस्तीपत्र आणि बक्षिसे मंजूर झालेल्यांची नावे आणि त्यापुढील कंसात बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे.  तपासात भाग घेतलेले व मा. न्यायालयात साक्ष दिलेले पोलिस अधिकारी व अंमलदार :- सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त किसन नारायण शेंगाळ ( ३५ हजार रुपये), सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव लक्ष्मण पाटील (३० हजार रुपये), सेवा निवृत्त दत्ता संभाजी ढवळे (३५ हजार रुपये), सेवा निवृत्त यशवंत रामचंद्र तावडे (३० हजार रुपये), सहाय्यक पोलिस आयुक्त अब्दूल समद अब्दूल रहेमान (३० हजार रुपये), सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद सातव (३० हजार रुपये), सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मारूती ताजणे (२५ हजार रुपये), सेवा निवृत्त सहाय्यक आयुक्त संजय आत्माराम खैरे (२५ हजार रुपये), पोलिस निरीक्षक केशव पातोंड (२५ हजार रुपये), सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक अनंत घुगे (२५ हजार रुपये), सहाय्यक पोलिस आयुक्त अ‍ॅन्थोनी स्टिव्हन मॅथ्यू (२५ हजार रुपये), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल लक्ष्मण देशमुख (२५ हजार रुपये), सेवा निवृत्त पोलीस उप अधिक्षक विश्वनाथ नामदेवराव जटाळे (२५ हजार रुपये), पोलीस निरीक्षक शिवाजी अवधुतराव ठाकरे (२० हजार रुपये), पोलीस निरीक्षक सुभाष रमेश दुधगांवकर (२० हजार रुपये), पोलीस निरीक्षक शशिकांत आनंदराव भंडारे (२०हजार रुपये), पोलिस निरीक्षक दिनेश परशुराम कदम (२०हजार रुपये), सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शंकर गंगाराम वाघ (२०हजार रुपये), सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद आसिफ सय्यद मोहमद (२० हजार रुपये), पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी (२० हजार रुपये), पोलिस निरीक्षक किसन अर्जुन गायकवाड (२० हजार रुपये), पोलीस निरीक्षक रमेश हनुमंतराव मोरे (२० हजार रुपये), सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक नारायण सुबराव पाटील (५ हजार रुपये), पोलिस हवालदार जगन्नाथ तुकाराम गोल्हार (५हजार रुपये), सहाय्यक पोलिस उप निरीक्षक संजय केशव पाटील (५ हजार रुपए) आणि पोलिस हवालदार तानाजी संतू पाटील (५ हजार रुपये).2. गोपनीय माहितीव्दारे गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक करण्यासाठी मदत करणारे मात्र मा. न्यायालयात साक्ष न झालेले पोलिस अधिकारी व अंमलदार :- सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नारायण कामत (१५हजार रुपये), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल दरेकर (१५ हजार रुपये), सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक अरूण खानविलकर (१५ हजार रुपये), सहाय्यक पोलिस आयुक्त दिनेश आहिर (१५हजार रुपए), सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक दिनेश अग्रवाल (१५हजार रुपये), पोलिस निरीक्षक शशांक शेळके (१५ हजार रुपये), पोलिस निरीक्षक मधुकर फड (१५हजार रुपये), पोलिस निरीक्षक शशिकांत एल. शिंगारे (10 हजार रुपए), पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे (१०हजार रुपये), पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे (१०हजार रुपये), धनंजय कंधारकर (१० हजार रुपये), पोलिस निरीक्षक सचिन मुरारी कदम (१० हजार रुपये), पोलिस निरीक्षक संदेश सदाशिव रेवाळे (१० हजार रुपये), पोलिस निरीक्षक निवृत्ती बापुराव कोल्हटकर (१०हजार रुपए), पोलिस निरीक्षक शेखर बागडे (१०हजार रुपये), सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दिलीप घाग (५ हजार रुपये), पोलिस उपनिरीक्षक सखाराम रेडकर (5 हजार रुपए), पोलिस हवालदार मोहन जनार्दन भाबल (5 हजार रुपए), पोलिस हवालदार अंकुश मुरारी परब (५हजार रुपए), पोलिस उपनिरीक्षक हिंदुराव चिंचोळकर (५ हजार रुपये), पोलिस हवालदार प्रकाश भास्कर आव्हाड (५ हजार रुपए), पोलिस हवालदार विजय साळवी (5 हजार रुपए), पोलिस हवालदार गणेश राजीव जाधव (५ हजार रुपए), पोलिस हवालदार एस.के. मुरकुटे (५हजार रुपये), पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न आगवने (५हजार रुपए), पोलिस शिपाई संतोष गायकवाड (5 हजार रुपए), पोलिस हवालदार लक्ष्मण बोरकर (५ हजार रुपए), पोलिस कर्मचारी संदिप गीधा मांजुलकर (५ हजार रुपये), पोलिस नाईक दिनेश दशरथ गायकवाड (५हजार रुपये), पोलिस कर्मचारी महेश रामचंद्र मुळे (५ हजार रुपये), पोलिस नाईक सुनिल माने (५ हजार रुपये), पोलिस कर्मचारी (स्वेच्छा निवृत्ती) सुनिल देसाई (५हजार रुपये), पोलिस कर्मचारी संतोष हिंदुराव साळुंखे (5 हजार रुपए), पोलिस कर्मचारी आकाश मांगले (5 हजार रुपए), पोलिस कर्मचारी प्रफुल्ल अनंत पाटील (५ हजार रुपये), पोलिस नाईक सचिन यशवंत खताते (५ हजार रुपए) आणि पोलिस नाईक रूपेश नथुराम पाकळे (५हजार रुपए).3. कोर्ट लायझनींग टिम झ्र सुनावणी कोर्ट, मा. उच्च व सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरणे चालविणारे अधिकारी व अंमलदार :- पोलिस निरीक्षक दिनकर नामदेव मोहिते (३५ हजार रुपये), सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जनार्दन मोहिते (३०हजार रुपये), सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळू वंजारे (१५ हजार रुपये), पोलिस उपनिरीक्षक गोरख रंगनाथ जाधव ( १०  हजार रुपये), पोलिस कर्मचारी शरद बाजीराव नाणेकर (१० हजार रुपये), पोलिस नाईक संदिप रामदास भोसले ( ५ हजार रुपए), पोलिस नाईक जयप्रकाश अनंत सुर्वे ( ५ हजार रुपये), पोलिस नाईक चंद्रसेन शंकर घत्तडगे (५ हजार रुपए), पोलिस कर्मचारी दिपक एकनाथ गालफाडे (१० हजार रुपये), पोलिस कर्मचारी तुकाराम दत्तात्रय राजीगरे (५ हजार रुपये), पोलिस नाईक होंडे शंकर भाऊसाहेब (५ हजार रुपये), पोलिस हवालदार महादेव सुदाम औटी (५ हजार रुपये), पोलिस नाईक प्रमोद माणिकराव टेकवले (१०हजार रुपये), पोलिस नाईक पोपट माधवराव मनगटे (५ हजार रुपये), पोलिस हवालदार मंगेश शरदचंद्र अभंग (५ हजार रुपये), पोलिस कर्मचारी मंजित पांडुरंग जाधव (५ हजार रुपये), पोलिस कर्मचारी अख्तर हाशिम शेख (५ हजार रुपये), पोलिस कर्मचारी सुदेश बबन उकारडे (५ हजार रुपये), पोलिस नाईक राजु अण्णा कदम (५ हजार रुपये), पोलिस नाईक महेश पांडुरंग मातेरे (५ हजार रुपये) आणि पोलिस नाईक अविनाश धुळजी ठिंगळे (५हजार रुपये)

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसterroristदहशतवादीState Governmentराज्य सरकार