‘साठ्ये’च्या प्राचार्यांवर अॅट्रोसिटी
By Admin | Updated: February 23, 2015 03:01 IST2015-02-23T03:01:33+5:302015-02-23T03:01:33+5:30
विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारप्राप्त साठे महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल

‘साठ्ये’च्या प्राचार्यांवर अॅट्रोसिटी
मुंबई : विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारप्राप्त साठे महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उपनगर समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्राचार्य कविता रेगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अॅट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी साठ्ये महाविद्यालयाने नियमबाह्य शुल्क घेतल्याचा ठपका विद्यापीठाच्या समितीने ठेवला होता. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसेचे विद्यापीठ सरचिटणीस संतोष धोत्रे यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे महाविद्यालयावर कारवाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)